वाशीम,
washim-depot आमदार श्याम खोडे यांच्या प्रयत्नातून वाशीम आगारात नवीन पाच ई बस प्राप्त झाल्या असून, त्यांचा शुभारंभ शनिवार ३१ ऑक्टोबर रोजी करण्यात आला. सदर कार्यक्रमाला अमरावती विभाग शिक्षक आमदार अॅड. किरण सरनाईक, नगराध्यक्ष अनिल केंदळे, सुरेश मापारी, भाजपा शहर अध्यक्ष मनीष मंत्री, निलेश सोमानी, प्राचार्य अरुण सरनाईक, बादशहा धामणे, दत्ता गोटे, सुनील तापडिया, रामा इंगळे, रामा ठेंगडे, राजू कलवार, जगदीश देशमुख, बस स्थानक व्यवस्थापक कर्मचारी वृंद, भाजपा पदाधिकारी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. यावेळी आगारातर्फे सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तद्नंतर गाडीमध्ये दोन्ही आमदार मान्यवरांनी शहराचा फेरफटका मारत प्रवास केला.

नवीन बस स्थानकाची पाहणी करून लवकरच सदर बस स्थानकाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. वाशीम बस स्थानक जिल्हा स्थानावर असून, आज घडीला हे लहान असल्यामुळे आपण संबंधितांना सहा नवीन प्लॅटफॉर्म तयार करण्याचे सांगितलेले आहे. लवकरच नवीन सहा प्लॅटफॉर्म सुद्धा प्रवाशांच्या सेवेसाठी तयार करण्यात येणार आहे. आत्तापर्यंत ३५ नवीन ई बस, शिवाई बसेस वाशीम - मंगरूळनाथ मतदार संघामध्ये आपल्या पुढाकाराने उपलब्ध झाल्या असून आणखी नवीन २० ई बसेस उपलब्ध होणार असल्याची माहिती यावेळी भाजपा आमदार श्याम खोडे यांनी यावेळी दिली.