आमगाव,
Gondia Newsस्थानिक भवभूती महाविद्यालयातील पदव्युत्तर एम.एस्सी. प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने भिलाई व डोंगरगड (छत्तीसगड) येथे एकदिवसीय शैक्षणिक अभ्यास दौर्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. के. रहांगडाले यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाखाली हा दौरा पार पडला. शिक्षण हे केवळ वर्गखोलीपुरते मर्यादित नसून निसर्गाच्या सान्निध्यात मिळालेले प्रत्यक्ष ज्ञान अधिक प्रभावी असते, या उद्देशाने या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.एम.बी.वराडे व प्रा.एन.के.मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना प्राण्यांचे शास्त्रीय नाव, नैसर्गिक अधिवास, आहार, वर्तन आणि संवर्धनाबाबत सविस्तर माहिती दिली. सर्व विद्यार्थ्यांनी डोंगरगड येथील १६०० फूट उंच डोंगरावर वसलेल्या प्रसिद्ध बम्लेश्वरी देवीचे दर्शन घेतले. सुमारे १००० पायर्या चढून देवीचे दर्शन घेत असताना विद्यार्थ्यांनी मंदिर परिसरातील निसर्गरम्य देखावा, डोंगरदर्या व वनराईतील जैवविविधतेचा प्रत्यक्ष अभ्यास केला.
...