मालेगाव,
husband-kills-wife तालुक्यातील जऊळका चारित्र्याच्या संशयातून पतीने झोपलेल्या पत्नीस जागीच पत्नीस कुर्हाडीचे घाव घालून हत्या केली आहे. सकाळी मुलगी आईच्या रुममध्ये गेली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी जऊळका पोलिसांनी आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दिनेश जोंधळे असे आरोपी पतीचे नाव असून, शारदा जोंधळे असे हत्या झालेल्या पत्नीच नाव आहे. दिनेश जोंधळे हा व्यसनाधीन असून, तो पत्नीवर नेहमी चारित्र्याचा संशय घ्यायचा.

यावरून दोघांमध्ये सातत्याने वाद होत होता. शनिवारी रात्री दरम्यान संशयाच भूत संचारले ल्या दिनेशने पत्नी झोपेत असताना पहाटे ४ ते ५ वाजता दरम्यान तिच्या मानेवर कुर्हाडीने वार केले. हा हल्ला एवढा गंभीर होता की, तिचा झोपेतच मृत्यू झाला. कुर्हाडीने वार केल्या नंतर आरोपी दिनेश जोंधळे हा पसार झाला होता. यांना तीन मुलं असून, दोन मुली विवाहित आहेत. तर मुलगा १५ वर्षांचा असून, तो शिक्षण घेत आहे. दिनेशचे वृद्ध आईवडील हे दिनेशच्या घरासमोर असलेल्या एका छोट्या घरात स्वतंत्र राहतात. घटनेच्या रात्री या दाम्पत्याचा एक मुलगा आणि मुलगी तेथे झोपण्यासाठी गेले होते. यासंधीचा फायदा घेऊन आरोपीने आपल्या पत्नीची हत्या केल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.