संघ शाखा म्हणजे देशभक्त नागरिक घडविण्याचे केंद्र : जयंत वसमतकर

    दिनांक :01-Nov-2026
Total Views |
रिसोड,
jayant-vasmatkar देशभक्त नागरिक घडवण्याचे केंद्र म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा आहे, असे प्रतिपादन जयंत वसमतकर यांनी केले. ते भर जहागीर येथे महादेव मंदिराच्यो प्रांगणात रास्व संघाच्या विजयादशमी उत्सव व शस्त्रपूजन कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पत्रकार संदीप पवार उपस्थित होते.
 
 
jayant-vasmatkar
 
ध्वजप्रणाम, प्रार्थना, शस्त्रपूजन,सुभाषित, वैयक्तिक गीतानंतर प्रमुख अतिथींचे स्वागत करण्यात आले. पुढे बोलताना जयंत वसमतकर म्हणाले की, असंघटित हिंदू समाजाला संघटित करून डॉ. हेडगेवार यांनी १९२५ साली विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. आज संघ १०१ वर्षाचा झाला असून, कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण, नागरि कर्तव्य पालन व स्वदेशी या पंच परिवर्तनामधून समाज घडवण्याचे कार्य संघाने सुरू केले आहे. या पंचपरिवर्तन कार्याची सुरुवात प्रत्येक स्वयंसेवकाने स्वतःच्या आचरणातून, कुटुंबातून व परिसरातून करावी असे आवाहनही वसमतकर यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ब्रह्मदेव नागरे यांनी केले. तर संचालन विनोद जायभाये यांनी केले. कार्यक्रमास स्वयंसेवक व संघप्रेमी नागरिक उपस्थित होते.