१ नोव्हेंबरपासून SBI मधून पैसे काढण्यावर बंदी?

    दिनांक :01-Nov-2026
Total Views |
नागपूर,
sbi-cash-withdrawal-rulesआज 1 नोव्हेंबर 2026 पासून अनेक नियमात बदल करण्यात आले. गॅस, दूध, दही अशा अनेक किंमतीमध्ये मोठी वाढ करण्यात आली. ग्राहकांना अनेक वस्तूंसाठी अधिकचे पैसे मोजावी लागणार आहेत. त्यातच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण बघायला मिळतंय. 1 नोव्हेंबर 2026 पासून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना काही निर्बंध येणार असून त्यांना व्यवहार करता येणार नाही, असा मेसेज सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. हा मेसेज पाहून अनेकांची झोप उडाली. कारण थेट दिवाळी तोंडावर असताना बँकेतून पैसे काढता येणार नसल्याने सर्वांनाच धक्का बसला. या मेसेजमध्ये म्हणण्यात आले की, बँकिंग क्षेत्रातील नियमात अचानक मोठा बदल करण्यात आला. 24 तासात निर्बंध लादण्यात आलीत. 1 नोव्हेंबरपासून ग्राहकांना एटीएम किंवा बँकेतून पैसे काढता येणार नाहीत.

sbigrahak
 
 
या व्हायरल होणाऱ्या मेसेजने अनेकांना धक्का बसला. कारण सध्याच्या घडीला लोकांकडे फार काही पैसे नसतात. सर्व पैसे हे बँकेत असतात. हा मेसेज बघितल्यानंतर लोकांना सर्वात अगोदर एटीएमकडे धाव घेतली. ही मेसेज बँकेतील तांत्रिक घटनांमुळे तयार झाला. त्याचे झाले असे की, काही दिवसांपूर्वी बँकेच्या 3,897 ग्राहकांच्या वैयक्तीक माहितीच्या नोंदी डार्क वेबवर आढळून झाल्या. याबाबत बँकेनेही पुष्टी केली. ही गोष्टी बँकेने गांर्भीयाने घेतली.
त्यांनी सायबर सुरक्षेची नोडल संस्था असलेल्या SERT-in मार्फत चाैकशी सुरू केली. यादरम्यान सायबर सुरक्षेच्या तांत्रिक प्रक्रियेत काही गैरवापर झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर थेट बँकेचे व्यवहारच बंद होणार असल्याची अफवा उठली. या व्हायरल मेसेजनंतर थेट महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालाने माहिती जारी केली. यात स्पष्ट करण्यात आले की, 1 नोव्हेंबरपासून पैसे काढण्यावर बंदी घातल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत असून हा मेसेज पूर्णपणे दिशाभूल करणारा आहे.
खातेदार पैशांचा 100 टक्के व्यवहार करू शकतात. 1 नोव्हेंबर किंवा त्यानंतरही ग्राहक बँकेतील प्रत्येक व्यवहार करू शकणार आहेत. व्हायरल मेसेजने अनेकांनी धक्का घेतला. हेच नाही तर मेसेज मिळाल्यानंतर काहींनी तात्काळ एटीएमकडे धाव घेतली. दिवाळी तोंडावर असल्याने मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. मात्र, त्यावेळी पैसे काढता येणार नसल्याने लोकांची झोप उडाली.