विषारी वायू गळतीमुळे चार कामगारांचा मृत्यू

    दिनांक :01-Nov-2026
Total Views |

उज्जैन,
ujjain-hotel-toxic-gas-deathउज्जैनमधील देवास मार्गावरील श्री गंगा हॉटेलमधील अन्न कचऱ्याच्या टाकीची पाहणी करण्यासाठी खाली उतरलेल्या एका कर्मचाऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात, इतर तिघेही चेंबरमध्ये शिरले. विषारी वायूमुळे या चौघांचाही मृत्यू झाला. सुरक्षा मानकांचे पालन आणि संभाव्य निष्काळजीपणाची पोलिस आणि न्यायवैद्यक पथक चौकशी करत आहेत.

karkhana
 
 
हॉटेलच्या परिसरामध्ये खाद्यान्नाचा कचरा साठवण्यासाठी बनवलेले चेंबर स्वच्छ करण्यासाठी एक कामगार उतरला. तो परत न आल्याने इतर तीन कामगार आत शिरले, मात्र विषारी वायुमुळे चौघांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि प्रशासकीय अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. चारही जणांना बाहेर काढून तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्याची माहिती उज्जैनचे पोलिस अधीक्षक प्रदीप शर्मा यांनी दिली.
 
 
प्राथमिक तपासात चेंबरमध्ये गॅस गळती झाल्याचे समोर आले आहे. तसेच गॅसच्या प्रादुर्भावामुळे चेंबरचा परिसर अत्यंत निसरडा झाला होता, ज्यामुळे लोक खाली पडले आणि बेशुद्ध झाले. त्यांना वाचवण्यासाठी खाली गेलेले इतर तरुणही या विषारी हवेच्या विळख्यात अडकले. जिल्हाधिकारी रौशन कुमार सिंह यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
मृतकांच्या कुटुंबीयांना चार लाखाची मदत
मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनीही उज्जैन घटनेवर दुःख व्यक्त करत म्हटले की, चार जणांच्या दुःखद मृत्यूची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. शोकाकुल कुटुंबियांप्रति माझ्या संवेदना आहेत. राज्य सरकारच्या वतीने मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.