सहारा वृद्धाश्रमात केली दिवाळी साजरी

विहीप बंजरंग दलाचा उपक्रम

    दिनांक :10-Nov-2026
Total Views |
मानोरा,
sahara-old-age-home दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विश्व हिंदू परिषद बजरंग दल, मानोरा प्रखंड यांच्या वतीने मुंगसाजीनगर येथील सहारा वृद्धाश्रात आजी आजोबा सोबत दिवाळी सण मोठ्या उत्साहात, आनंदात आणि आपुलकीच्या वातावरणात साजरा केला. विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या सेवा संकल्पनेतून राबविण्यात येणार्‍या या उपक्रमाचे यंदा पाचवे वर्ष होते.
 
 
sahara-old-age-home
 
दिवाळी आनंद, प्रकाश आणि आपुलकीचा सण आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत या सणाचा आनंद पोहोचावा या उदेशाने, आपल्या परिवारा पासुन दुर वृद्धाश्रमात राहणार्‍या आजी - आजोबांनाही सणाचा आनंद घेता यावा, या भावनेतून हा सेवाभावी उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहारा वृद्धाश्रमाला भेट देऊन तेथील आजी-आजोबांसोबत काही आनंदाचे क्षण व्यतीत केले. त्यांच्या चेहर्‍यावर हास्य फुलावे आणि त्यांना आपलेपणाची जाणीव व्हावी, या उद्देशाने त्यांना नवीन कपडे, दिवाळीचा फराळ, बिस्किटे, फळे तसेच भोजन देण्यात आले.केवळ वस्तूंचे वाटप न करता वृद्धांशी संवाद साधत, त्यांची आपुलकीने विचारपूस करत आणि त्यांच्या सुख - दुःखात सहभागी होत कार्यकर्त्यांनी दिपावलीचा आनंद द्विगुणित केला. या उपक्रमातून माणुसकी, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावाचा सुंदर संदेश देण्यात आला.
 
 
विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने हा सेवाकार्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. संघटनेच्या सेवा, सुरक्षा आणि संस्कार या विचारांना प्रत्यक्ष कृतीतून समाजापर्यंत पोहोचविण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. समाजातील गरजू आणि ज्येष्ठ नागरिकांच्या चेहर्‍यावर आनंद फुलविणे, त्यांच्या आयुष्यात आपुलकीचा प्रकाश निर्माण करणे आणि प्रत्येक सणात त्यांना सहभागी करून घेणे, हीच खरी दिवाळी आहे. या सेवाकार्यात बजरंग दल जिलाध्यक्ष करन ठाकुर, विश्व हिंदू परिषद तालुका अध्यक्ष राम हेडा, उपाध्यक्ष कृष्णा साखरकर, डॉ. यावलकर, हेमंत देशमुख, अतुल राउत, रूपेश जोशी,सचिन पडघान, मयूर देशमुख, संतोष वजीर, संकेत उगले,राज चव्हाण, प्रेम राठोड, साहिल राठोड़, विजय शिंदे, विवेक रत्नपारखी, आकाश गांढवें, दत्ता जाट्टे आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.