बंजारा समाजाच्या न्याय आणि रास्त आरक्षणाच्या मागणीसाठी सदैव सोबत

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील

    दिनांक :10-Nov-2026
Total Views |
मानोरा,
manoj-jarange-patil मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या तीर्थक्षेत्र बंजारा तिर्थक्षेत्र पोहरादेवी येथे धर्मगुरु आमदार बाबुसिंग महाराज बंजारा समाजाच्या यांची भेट घेऊन एसटी आरक्षणासह समाजाच्या विविध समस्यावर चर्चा करून साथ देण्याचे अश्वासन दिले.
 

manoj-jarange-patil
 
मनोज जरांगे पाटील यांनी तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे जगदंबा देवी, जगद्गुरू संत सेवालाल तसेच राष्ट्रसंत डॉ. रामराव महाराज समाधीस्थळाचे नतमस्तक होत आशीर्वाद घेतला.जगदंबादेवी व संत सेवालाल महाराज समाधीस्थळी महंत कबीरदास महाराज आणि महंत गोपाल महाराज यांनी शाल, श्रीफळ व कवलपट्टा देऊन त्यांचा सन्मान केला. बापू आश्रमात भक्तराज राठोड महाराज यांनी, तर राष्ट्रसंत डॉ. रामराव महाराज यांच्या समाधीस्थळी देवीभक्त महंत शेखर महाराज आणि संजय महाराज यांनी त्यांचा सत्कार केला. या दौर्‍यात बापू आश्रमात धर्मगुरू तथा आमदार बाबुसिंग महाराज आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात जवळपास एक तास बंदद्वार चर्चा झाली. या चर्चेचा तपशील अधिकृतरीत्या समोर आला नसला तरी बंजारा समाजाच्या विविध सामाजिक प्रश्नांवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
 
 
यावेळी बोलताना जरांगे पाटील यांनी बंजारा समाजातील कष्टकरी कुटुंबांतील मुलांनी शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती करावी, उच्च पदांवर पोहोचावे आणि त्यांना आवश्यक शैक्षणिक संधी व सवलती मिळाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली. बंजारा समाजाच्या आरक्षण, शिक्षण आणि रोजगाराच्या प्रश्नांसाठी आपला सदैव पाठिंबा राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. मनोज जरांगे पाटील पोहरादेवी येथे दर्शनासाठी येत असल्याची माहिती मिळताच मानोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. धार्मिक श्रद्धेच्या केंद्रस्थानी झालेली ही भेट केवळ दर्शनापुरती मर्यादित न राहता सामाजिक, राजकीय प्रश्नावर खमंग चर्चा झाल्याचे ऐकावयास येत आहे.