मनिला,
Plane crashes in the Philippines फिलिपाइन्सच्या दक्षिण भागात सहा परदेशी नागरिकांना घेऊन जाणारे खासगी विमान कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातानंतर परिसरात बचावकार्य सुरू करण्यात आले असून, विमानातील प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची नेमकी स्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. या दुर्घटनेत कोणाचा मृत्यू झाला आहे किंवा कोणी जखमी झाले आहे का, याबाबतही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
दावाओ डेल सुर प्रांतातील डिगोस शहराच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचे अधिकारी जोमार कॅलेडो यांनी बचाव मोहीम सुरू असल्याची माहिती दिली. दक्षिण फिलिपाइन्समध्ये हा अपघात झाल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. विमानात सहा विदेशी नागरिक प्रवास करत असल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, अपघात नेमका कशामुळे झाला, विमानातील प्रवाशांचे काय झाले आणि दुर्घटनेत किती जण प्रभावित झाले, याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. बचाव पथकांकडून शोधमोहीम सुरू असून, प्रशासनाकडून पुढील तपशील मिळण्याची प्रतीक्षा आहे.