१५ वर्षीय शालेय विद्यार्थिनी गर्भवती; २३ वर्षीय तरुणावर बलात्काराचा गुन्हा

सहा महिन्यांपूर्वी ओळख; निर्जनस्थळी लैंगिक अत्याचार

    दिनांक :10-Nov-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
sexual assault नागपुरात १५ वर्षीय शालेय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याने ती गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी २३ वर्षीय तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. पंकजराम भलावी (२३, रा. इंदिरा नगर) असे आरोपीचे नाव आहे. पीडित मुलीच्या ३५ वर्षीय आईने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
 
 
sexual assault
 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची पीडित मुलीशी सुमारे पाच ते सहा महिन्यांपूर्वी ओळख झाली होती. त्यानंतर तो तिला भेटण्यासाठी लॉ कॉलेज चौक परिसरातील तिच्या महाविद्यालयात जात असल्याचे तक्रारीत नमूद आहे. दरम्यान, आरोपीने मुलीला सिव्हिल लाइन्स परिसरातील बंद असलेल्या सीपीडब्ल्यूडी कार्यालयाजवळ आणि प्राजक्ता बंगल्याच्या मागील बाजूस असलेल्या निर्जनस्थळी नेले. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर मुलगी गर्भवती राहिली. तिची प्रकृती आणि गर्भधारणेची बाब समोर आल्यानंतर तिला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले.sexual assault सध्या तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. आईच्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ६३, ६४ आणि ६५(१) तसेच पॉक्सो कायद्याच्या कलम ४ आणि ६ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.