वर्धा जिल्ह्यात १००० मुलांमागे ९३५ मुली

    दिनांक :11-Nov-2026
Total Views |
वर्धा,
wardha-district भाऊबीज... सणांचा राजा दिवाळीच्या सणातील शेवटचा सण. या सणाला सासरी गेलेल्या बहिणीला घ्यायला जातो. बहिणही या निमित्ताने बाहेरी येते. कुटुंब व्यवस्थेत विभत कुटुंब पद्धतीने प्रवेश केला असला तरी अजूनही भाऊ बहिणीचे नाते कायम आहे. दुर्देवाने मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर वर्धेसारख्या जिल्ह्यात आजही कमी आहे. १ हजार मुलांमागे ९३५ मुली असल्याचे शासकीय आकडेवारी सांगते. मुलगा आणि मुलीत भेदाभेद नको असे जाहीरपणे सांगितले जात असले तरी मुलांची वाढती संख्या पाहता आजही मुलगी नकोचा सुर कायम असल्याचे दिसुन येते. भविष्यात भाऊबिजेला ओवाळायला सख्खी बहीण राहिल की नाही, असा प्रश्न आजची आकडेवारी पाहता लक्षात येते.
 
 
wardha-district
 
आज मुली कोणत्याही क्षेत्रात मुलांपेक्षा कमी नाहीत. त्या शिक्षण, क्रीडा, विज्ञान आणि प्रशासन यासह विविध क्षेत्रांमध्ये यशाची नवीन उंची गाठत आहेत. आपल्या प्रतिभेने आणि कर्तृत्वाने त्यांनी हे सिद्ध केले आहे. संधी मिळाल्यास त्या कोणापेक्षाही कमी नाहीत. परिणामी, समाजाने मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यास सुरुवात केली आहे. वर्धा जिल्ह्यात १३ ऑटोबरपर्यंत उपलब्ध आकडेवारीनुसार १००० मुलांमागे ९३५ मुलींचा जन्मदर झाला आहे.
 
 
गेल्या काही वर्षांतील आकडेवारी पाहता जिल्ह्यातील मुलींच्या जन्मदरात चढ-उतार दिसून आला आहे. जन्म नोंदणीच्या आकडेवारीनुसार २०२० मध्ये जिल्ह्यात ९ हजार ३०२ मुले आणि ८ हजार ७३९ मुलींचा जन्म झाला. या कालावधीत जन्मदर दर १००० मुलांमागे ९३९ मुलींचा होता. २०२१ मध्ये ८,५५२ मुले आणि ७,७५४ मुलींचा जन्म झाला, ज्यामुळे जन्मदर ९०७ पर्यंत खाली आला. २०२२ मध्ये ८,९६७ मुलांच्या तुलनेत ८,३७० मुलींचा जन्म झाल्याने जन्मदरात सुधारणा झाली. यावर्षी जन्मदर ९३३ होता. २०२३ मध्ये ८,०९७ मुले आणि ७,५४० मुलींचा जन्म झाला, ज्यामुळे जन्मदर ९३१ वर पोहोचला. २०२४ मध्ये ८,१७५ मुले आणि ७,५७६ मुलींचा जन्म झाला. त्यामुळे जन्मदर ९२७ वर पोहोचला. २०२५ मध्ये ७,६१३ मुले आणि ६,८५५ मुलींचा जन्म झाला, त्यामुळे जन्मदर ९०० पर्यंत खाली आला. २०२६ मध्ये १३ ऑटोबरपर्यंत जिल्ह्यात ५ हजार ९ मुले आणि ४ हजार ६८५ मुलींचा जन्म झाला. या कालावधीत दर १००० मुलांमागे ९३५ मुलींचा जन्म झाला.
 
 
जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. मंगेश रेवतकर यांनी सांगितले की, जिल्ह्यात गर्भधारणा निदान तंत्र प्रतिबंधक कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात असून, त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. १३ ऑटोबर २०२६ पर्यंत जिल्ह्यात ५,००९ मुले आणि ४,६८५ मुलींचा जन्म झाला आहे.