हिंगणघाट शहरात आगीच्या चार घटना

फटायांसह शॉर्टसर्किट कारणीभूत

    दिनांक :11-Nov-2026
Total Views |
हिंगणघाट,
four-fire-incidents-in-hinganghat-city दिवाळीच्या उत्साहादरम्यान हिंगणघाट शहरात विविध ठिकाणी आग लागण्याच्या चार घटना घडल्या. यापैकी एका ठिकाणी फटायांच्या ठिणगीमुळे तर अन्य तीन ठिकाणी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनांमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यत केला जात आहे. मात्र, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे चारही ठिकाणच्या आगीवर वेळीच नियंत्रण मिळविण्यात यश आल्याने अनर्थ टळला.
 
 
four-fire-incidents-in-hinganghat-city
 
मिळालेल्या माहितीनुसार, बिडकर महाविद्यालय परिसरातील कचर्‍याला फटायांच्या ठिणगीमुळे आग लागली तर माता मंदिर परिसरातील एका घरात विद्युत शॉर्टसर्किट झाल्याने आग लागून घरातील साहित्य जळाले. याशिवाय प्रवीण बरेहा यांच्या घरातील फ्रिजमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. तसेच विनोद भवन येथील पॅसिफिक क्रिकेट लबच्या व्यायामशाळेतही शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याची घटना घडली. घटनांची माहिती मिळताच नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचे काम सुरू केले. अग्निशमन दलाचे अधिकारी गौरव गणार यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील डोलस, कृष्णा डबले, ओम लडी, किशोर समर्थ आणि अमित सहारे यांनी तत्परतेने कार्यवाही करत चारही ठिकाणच्या आगीवर नियंत्रण मिळविले.
 
घराला आग; लाखोचे नुकसान
वर्धा : घराला आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही घटना ९ नोव्हेंबर रोजी रात्री घडली. स्थानिक ठाकरे मार्केट परिसरातील पाल यांच्या घराच्या पहिल्या माळ्यावरील खोलीला आग लागली. यात घरातील साहित्य जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच वर्धा नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळ गाठून सुमारे एक तासांच्या प्रयत्नाअंती परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. आग विझविण्यासाठी विशाल नाईक, सुजात अली, अमोल शेंडे, प्रशिल देशमुख आदींनी प्रयत्न केले. या आगीत सुमारे दोन लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.