शासकीय तांत्रिक विद्यालयाला डॉ. नारायण खटी यांचे नाव

    दिनांक :11-Nov-2026
Total Views |
गडचिरोली,
dr-narayan-khati राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाने 51 शासकीय तांत्रिक विद्यालयांची नावे बदलण्यास मान्यता दिली असून, यात विदर्भातील 27 तर जिल्ह्यातील तीन प्रमुख विद्यालयांचा समावेश आहे. गडचिरोली येथील शासकीय तांत्रिक विद्यालयाचे आता दिवंगत डॉ. नारायण खटी विद्यालय असे नामकरण केले. डॉ. नारायण खटी हे 1975 ते 1977 दरम्यान मोसाच्या आणिबाणीमध्ये जेलमध्ये गेले होते. 
 
 
dr-narayan-khati
 
आरमोरीत शासकीय तांत्रिक विद्यालयाला दिवंगत वामनराव वनमाळी यांचे नाव देण्यात आले तर कुरखेडा येथील शासकीय तांत्रिक विद्यालयाला पारिजातक बावनथडे विद्यालय असे नाव दिले आहे. शासनाने स्थानिक भूमिपूत्र, स्वातंत्र्यसैनिक, हुतात्मे, थोर महापुरुष व शिक्षण तसेच सामाजिक क्षेत्रात योगदान देणार्या या मान्यवरांचा गौरव करण्याच्या दृष्टीने हे नामांतर करण्यात आले आहे.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या वतीने मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख, अभियांत्रिकी तंत्रज्ञानाची मूलभूत तत्त्वे तसेच विद्युत आणि इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानाची मूलभूत तत्त्वे हे तीन बहुकौशल्ययुक्त पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम इयत्ता नववी आणि दहावीच्या स्तरावर 1996-97 पासून सुरू आहेत. सद्यस्थितीत राज्यात अशी 162 शासकीय तांत्रिक विद्यालये कार्यान्वित असून, यापूर्वी कोकण व नाशिक विभागातील 25 विद्यालयांची नावे बदलण्याचा निर्णय 21 ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आला होता.