मालेगाव,
married-woman-harassed-for-money मालेगाव तालुयातील शिरपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्या चिचांबा पेन येथे विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी शिरपूर पोलिसांनी पतीसह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. माहेरून चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी एक लाख रुपये आणण्याचा तगादा लावून शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. तसेच याबाबत माहेरच्या मंडळींना सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार विवाहितेने केली आहे.
या प्रकरणी मोनाली उमेश गायकवाड वय १९ , राहणार चिचांबा पेन तालुका रिसोड जिल्हा वाशीम सध्या आपल्या माहेरी पांगरखेडा, तालुका मालेगाव, येथे राहत आहे. यांनी शिरपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पती उमेश सदाशिव गायकवाड वय २०, सासरे सदाशिव शिवाजी गायकवाड वय ४५, सासू रंजना सदाशिव गायकवाड वय ४०, रुपेश सदाशिव गायकवाड वय २५ वर्षे, गायत्री रुपेश गायकवाड वय २३ , सोमेश सदाशिव गायकवाड वय २२ , निशा सोमेश गायकवाड वय २१, सर्व राहणार चिचांबा पेन शिवानी संतोष खिल्लारे वय २८, राहणार वाशीम आणि रावणाबाई शिवाजी गायकवाड वय ६०, राहणार निजामपूर, तालुका रिसोड अशा नऊ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, २८ एप्रिल २०२६ पासून ११ ऑटोबर २०२६ रोजी मध्यरात्री २ वाजेपर्यंतच्या कालावधीत आरोपींनी विवाहितेकडे माहेरून चारचाकी वाहन घेण्यासाठी एक लाख रुपये आणण्याची मागणी केली. यासाठी वारंवार तगादा लावून तिला शिवीगाळ करण्यात आली. तसेच थापडाबुयांनी मारहाण करून शारीरिक व मानसिक त्रास दिला. या प्रकाराबाबत माहेरच्या लोकांना काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. महिला तक्रार निवारण केंद्र, वाशीम येथून गुन्हा दाखल करण्याबाबतचे पत्र प्राप्त झाल्यानंतर ११ नोव्हेंबर रोजी शिरपूर पोलिसांनी तक्रार नोंदवून भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ८५, ११५(२), ३५१(२), ३५१(३) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला.पोलिस निरीक्षक योगिता भारद्वाज यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ अंकुश चव्हाण पुढील तपास करीत आहेत.