महागाईचा आणखी एक झटका! दूध दरात ४ रुपयांपर्यंत वाढ

    दिनांक :11-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Mother Dairy's decision to raise prices महागाईच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांना आता दूध दरवाढीचाही सामना करावा लागणार आहे. मदर डेअरीने आपल्या विविध प्रकारच्या दुधाच्या किमतीत प्रति लिटर २ ते ४ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हे नवे दर गुरुवार, १२ नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने यापूर्वी १४ मे २०२६ रोजी दुधाच्या किमती वाढवल्या होत्या. त्याआधी एप्रिल २०२५ मध्ये दरांमध्ये बदल करण्यात आला होता. त्यामुळे पुन्हा झालेल्या या दरवाढीचा परिणाम दूध खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या मासिक खर्चावर होणार आहे.
 
 
 
Mother Dairy
 
दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येणाऱ्या दुधाच्या किमती वाढल्यामुळे कंपनीच्या उत्पादन खर्चात भर पडली आहे. या वाढलेल्या खर्चाचा भार कमी करण्यासाठी मदर डेअरीने ग्राहकांसाठीचे दर वाढवण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. कंपनीकडून दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात दररोज सुमारे ३५ लाख लिटर दुधाची विक्री केली जाते, तर देशभरातील एकूण विक्रीचे प्रमाण प्रतिदिन ५० लाख लिटरपेक्षा अधिक आहे. नव्या दरांनुसार, टोंड दूध (थोक वितरण) ५८ रुपयांऐवजी ६० रुपये प्रति लिटर, फुल क्रीम दूध (पाऊच) ७२ रुपयांऐवजी ७६ रुपये, टोंड दूध (पाऊच) ६० रुपयांऐवजी ६
 
 
भाजीपाला, शिक्षण आणि आरोग्य सेवांच्या वाढत्या खर्चामुळे आधीच आर्थिक नियोजन कोलमडलेल्या सर्वसामान्य कुटुंबांना या दरवाढीचा आणखी एक फटका बसणार आहे. दूध हा दैनंदिन गरजेचा पदार्थ असल्याने त्याच्या वापरात कपात करणे अनेक कुटुंबांसाठी शक्य नसते. चहा, कॉफी तसेच रोजच्या आहारात दुधाचा वापर होत असल्याने दरवाढीचा परिणाम घरगुती बजेटवर होणार आहे. विशेषतः नियमित दूध खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आता प्रत्येक महिन्याला अधिक पैसे मोजावे लागतील. दरवाढीबाबत मदर डेअरीकडून अधिकृतपणे काय भूमिका मांडली जाते, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.