सेलू,
rampant-excavation-of-murrum तालुयातील धपकी, चारमंडळ, कोटंबा, इटाळा भागातून रात्री मुरूम उत्खनन करून त्याची मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जात आहे. नियम डावलून होणारी ही वाहतूक महसूल पथकाकडून दुर्लक्षित होत असून या उत्खननाला परवानगी कुणाची, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सेलू तालुयात वडगाव रस्ता, रेहकी रस्ता, पांदण रस्ता आदी बांधकामे केली जात आहे. पण, या कामात वापरला जाणारा मुरूम नेमका येतो कुठून आणि हा कायदेशीर मार्गाने मिळविला आहे काय? असाच प्रश्न विचारला जात आहे.

हा मुरूम धपकी शिवारातून येत असल्याचे चित्र आहे. याच धपकी शेत शिवाराला भगदाड पाडून मुरूम उत्खनन केले जात आहे. आधीच समृद्धी महामार्ग आणि तुळजापूर महामार्गाच्या बांधकामा दरम्यान या परिसरात मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात आले. या उत्खननाने मोठ्या टेकड्या नेस्तनाबूत झाल्या आहे. तर अनेक शेतांना भगदाड पडले आहे. आता पुन्हा याच भागात उत्खनन करण्याला जोर आला आहे. या उत्खननाला महसूल विभागाची परवानगी आहे काय. नेमका किती ब्रास मुरूम काढण्याची परवानगी आहे, असाही प्रश्न उपस्थित होतो. दिवसाच्या तुलनेने रात्रीच्या वेळेत मोठ्या प्रमाणात मुरूम वाहतूक होत आहे. रात्रीच्या वेळी होणार्या या वाहतुकीमुळे वाहनांची तपासणी होते की नाही, वाहतूक परवान्याची पडताळणी केली जाते की नाही, हा प्रश्नही उपस्थित होत आहे.
महामार्गांच्या कामांनी आधीच भुभागाची वाताहत
समृद्धी महामार्ग आणि तुळजापूर महामार्गाच्या बांधकामादरम्यान तालुयातील या परिसरात मोठ्या प्रमाणात मुरूम उत्खनन झाल्याचे दिसून आले. या उत्खननामुळे अनेक ठिकाणच्या टेकड्यांचे स्वरूप बदलले असून, काही शेतजमिनींच्या कडांना मोठे खड्डे आणि भगदाड पडल्याचे चित्र आहे. नैसर्गिक भूभागात झालेल्या या बदलांचा परिणाम शेती आणि परिसराच्या पर्यावरणावर होण्याची शयता व्यत केली जात आहे. पण, याकडे अद्याप प्रदूषण नियंत्रण मंडळाचे लक्ष गेले नाही. आधीच्या उत्खननातून परिसर अद्याप सावरलेला नसतानाच पुन्हा त्याच भागात मुरूम उपस्याला वेग आल्याचे चित्र आहे. त्यामुळे उत्खननासाठी निश्चित केलेल्या जागा, मंजूर क्षेत्र आणि प्रत्यक्षात सुरू असलेल्या उत्खननाची तुलना करण्याची आवश्यकता आहे.