भाऊबीजेला बुधाचा उदय; पाच राशींच्या नशिबाचे उघडणार दार!

    दिनांक :11-Nov-2026
Total Views |
Rising of Mercury on Bhau Beej आज भाऊबीजेच्या दिवशी (११ नोव्हेंबर) सकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी बुध ग्रहाचा उदय झाला आहे. ज्योतिषशास्त्रात बुधाला बुद्धिमत्ता, संवादकौशल्य, व्यापार आणि आर्थिक व्यवहारांचा कारक ग्रह मानले जाते. त्यामुळे बुधाच्या उदयाचा काही राशींवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो, असे ज्योतिषशास्त्र सांगते. या काळात आर्थिक परिस्थितीत सुधारणा, उत्पन्नाचे नवीन मार्ग आणि रखडलेल्या कामांना गती मिळण्याचे संकेत आहेत. विशेषतः वृषभ, मिथुन, कर्क, कन्या आणि धनु या पाच राशींसाठी हा काळ अनुकूल ठरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 
 

Rising of Mercury on Bhau Beej
 
वृषभ राशीच्या व्यक्तींना आर्थिक आघाडीवर दिलासा मिळू शकतो. त्यांच्या संवादकौशल्यात सुधारणा होऊन इतरांशी संबंध अधिक दृढ होतील. हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठीही हा काळ लाभदायी ठरू शकतो. आर्थिक स्थिती सुधारण्यासोबतच कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. धनलाभाच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. कर्क राशीच्या व्यक्तींना नवीन घर किंवा मालमत्ता खरेदी करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते. कार्यक्षेत्रात त्यांच्या कामाची दखल घेतली जाईल, तसेच गुंतवणुकीतून लाभ मिळण्याचे संकेत आहेत. कन्या राशीच्या व्यक्तींच्या बोलण्यात अधिक गोडवा येईल आणि कौटुंबिक मतभेद दूर होण्यास मदत होईल. नोकरी करणाऱ्यांना कामातील चांगल्या कामगिरीमुळे कौतुकासह पदोन्नतीची संधी मिळू शकते. तर धनु राशीच्या व्यक्तींना व्यवसायात फायदा होण्याची शक्यता असून व्यवसायविस्ताराचे मार्ग खुले होतील. याशिवाय दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्णत्वास जाण्याचे योग आहेत.