कारंजा लाड,
satisfaction-among-traders दिवाळी सणाचा उत्साह सर्वत्र ओसंडून वाहत असताना कारंजा शहरासह तालुयातील कामरगाव, उंर्बडा बाजार आणि धनज यासह इतर बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली . दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध बाजारपेठा ग्राहकांनी फुलून गेल्या असून, वाहन खरेदीपासून ते कपडे, सोने-चांदी, इलेट्रॉनिक वस्तू, घरगुती साहित्य आणि फटायांच्या खरेदीपर्यंत सर्वच क्षेत्रांत मोठी उलाढाल झाल्याचे दिसून आले.

दिवाळी म्हटले की नवीन वस्तूंची खरेदी, घराची सजावट, नवीन कपडे आणि फराळाची तयारी यांना विशेष महत्त्व असते. हीच परंपरा जपत नागरिकांनी यंदाही दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेला पसंती दिली आहे. सणाच्या निमित्ताने बाजारात खरेदीचा उत्साह शिगेला पोहोचला असून, सकाळपासून रात्री उशिरापर्यंत दुकानांमध्ये ग्राहकांची वर्दळ सुरू आहे. अनेक ठिकाणी साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर नवीन वाहन खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल असतो. यंदाही दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. विविध वाहनांच्या शोरूममध्ये ग्राहकांची गर्दी असून, नवीन वाहन घरी नेण्याचा आनंद अनेक कुटुंबांनी घेतला आहे. वाहन विक्रेत्यांकडूनही ग्राहकांना आकर्षक ऑफर्स आणि विविध सवलती दिल्या जात आहेत. दिवाळीनिमित्त नवीन कपडे खरेदीला विशेष महत्त्व असल्याने शहरातील कापड दुकानांमध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलांची मोठी गर्दी होत आहे. विविध प्रकारचे आकर्षक कपडे, साड्या, रेडिमेड वस्त्रे आणि फॅशन साहित्य खरेदी करण्यासाठी ग्राहकांची लगबग दिसून आली. त्याचबरोबर सोने-चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीला अजूनही ग्राहकांकडून प्रतिसाद मिळत आहे.
शुभमुहूर्तावर दागिने खरेदी करण्याची परंपरा अनेक नागरिकांनी जपली आहे.दिवाळीचा आनंद द्विगुणित करणार्या फटायांच्या खरेदीसाठीही बाजारात मोठी गर्दी होती. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये फटाके खरेदीचा उत्साह दिसून येत आहे. याशिवाय आकाशकंदील, पणत्या, विद्युत रोषणाई, रांगोळी साहित्य, पूजेचे साहित्य, मिठाई, फराळाचे पदार्थ आणि घरगुती सजावटीच्या वस्तूंच्या दुकानांमध्येही ग्राहकांची मोठी वर्दळ दिसून आली .गेल्या काही दिवसांपासून दिवाळीच्या खरेदीला वेग आला असून, शहरातील लहान-मोठ्या व्यापार्यांना याचा लाभ होत आहे. ग्राहकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाले आहे. किरकोळ विक्रेत्यांपासून मोठ्या व्यावसायिकांपर्यंत सर्वच स्तरांवर व्यापाराला चालना मिळत असल्याचे चित्र होते. दिवाळीच्या निमित्ताने स्थानिक बाजारपेठेत पैशांची मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली असून, व्यापार क्षेत्रासाठी हा सण आर्थिकदृष्ट्याही महत्त्वाचा ठरला .एकंदरीत, दिवाळीच्या प्रकाशपर्वाने कारंजा शहरातील बाजारपेठेला नवी झळाळी दिली असून, ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि व्यापार्यांमधील उत्साह यामुळे शहरात सर्वत्र सणासुदीचे आनंददायी वातावरण निर्माण झाले आहे.