मानोरा,
gomata तालुयातील मौजे आसोला खुर्द येथे दिवाळी गोवर्धन पूजेच्या निमित्ताने गोमातेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. शेकडो वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने जपण्यात आली. गोवर्धन पूजेच्या दिवशी सकाळी गावातील गो मातेला आंघोळ घालून हळद-कुंकू लावत सजवून फुलांच्या माळ अर्पण करत गावातील प्रमुख मार्गांवरून गोमातेची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी डफडीची तालावर ’गो माता की जय’ च्या जयघोषात संपूर्ण गाव दुमदुमून गेले होते. मिरवणुकीत गायकी, बालक सहभागी झाले होते. महिलांनी औक्षण करून गोमातेचे स्वागत केले.
ठिकठिकाणी गावकर्यांनी गाईंची पूजा करून त्यांना गुळ, हरभरा आणि नैवेद्य दाखविला. गोवर्धन पूजेनिमित्त गावातील गोठ्यात आणि गावातील महान तपस्वी परमहंस संत श्री सोहमनाथ महाराज, देवी जगदंबा माता, संत सेवालाल महाराज मंदिरात गोवर्धन पर्वताची प्रतिकृती तयार करून त्याची विधिवत पूजा करण्यात आली. गायींचे रक्षण करणार्या श्रीहरी, श्रीनारायण श्रीकृष्णाची आठवण या पूजेतून करण्यात आली. गाय ही आपली माता असून तिचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे, असा संदेश यावेळी देण्यात आला.
पूर्वजापासून चालत आलेली ही परंपरा आजची गायकी तरुण पिढीही तितयाच उत्साहाने पुढे नेत आहे. मिरवणुकीमुळे गावात एकोपा आणि बंधुभाव वाढतो, असे याप्रसंगी दिसून आले. या मिरवणुकीत श्रीनारायणाच्या वेशभूषेत गायकी सुरेश महाराज, सुभाष महाराज, पांडुरंग महाराज, राजाराम महाराज यांच्यासह इतर सहभागी झाले होते. गाव प्रदक्षिणा फेरी नंतर शांततेत आणि आनंदी वातावरणात मिरवणुकीचा समारोप झाला.