वर्धा,
dr-bhoyar महात्मा फुले यांच्या मते शिक्षण हे केवळ नोकरी मिळविण्याचे साधन नाही तर माणसाला विचार करण्याची, अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची आणि स्वतःचे अस्तित्व ओळखण्याची शती देणारे माध्यम आहे. आजची तरुणाई उच्च शिक्षण घेत आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगाशी जोडली जात आहे. मात्र, या प्रगतीसोबत सामाजिक जाणीव, संवेदनशीलता आणि विवेकाची जोड असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. हातात आधुनिक तंत्रज्ञान असताना डोयात महात्मा फुलेंचे पुरोगामी विचार असणे ही काळाची गरज असल्याचे आवाहन राज्यमंत्री तथा जिल्हाचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी व्यत केले.
श्री माळी वैभवतर्फे स्थानिक सत्यनारायण बजाज वाचनालयात गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. उद्घाटक म्हणून आनंदवन वरोरा येथील विश्वस्त सुधाकर कडू उपस्थित होते. अध्यक्षस्थानी डॉ. प्रा. धनंजय सोनटके होते तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, विकास सावरकर, डॉ. सागर गौरकर, दीपक फुलकरी, विनय डहाके, डॉ. कल्याणी धाकुलकर, अमन सुतरकर, मुख्य आयोजक वासुदेव कडुकर, संदीप चिचाटे, रोहिणी पाटील, रिद्धी लेकुरवाळे यांची उपस्थिती होती.
नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी महात्मा फुले यांच्या विचारांची समाजाला गरज असल्याचे मत व्यत केले. श्री. माळी वैभव मासिक द्वारा गेल्या १३ वर्षांपासून समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येतो. या वर्षीही ७० विद्यार्थ्यांचा व मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. कार्यक्रमाला सतीश मेहत्रे, अनिल धाकुलकर, अरुण डेकाटे, अजय सुरसे, अशोक नंदरधने, प्रभाकर सुतरकर, पंकज गोरडे, अभिराज नागतोडे, स्मिता डहाके, चंदा डेकाटे, प्रियंका फुलकरी, संगीता बेंदेवार, श्रावणी सोनटके उपस्थित होते.