३१ वर्षीय खेळाडूला न्यूझीलंडकडून पदार्पणाची संधी!

    दिनांक :12-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली,
new-zealand भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील अखेरच्या दोन सामन्यांसाठी न्यूझीलंड क्रिकेटने आपला संघ जाहीर केला आहे. दुखापतींच्या समस्यांमुळे न्यूझीलंडला संघात सातत्याने बदल करावे लागत आहेत. याच पार्श्वभूमीवर ३१ वर्षीय ब्रेट रँडेल याला प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. न्यूझीलंडने चौथ्या आणि पाचव्या एकदिवसीय सामन्यांसाठी जाहीर केलेल्या संघात ब्रेट रँडेलचा समावेश केला आहे. रँडेलने अद्याप न्यूझीलंडकडून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. नुकत्याच झालेल्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये त्याने डर्बीशायरकडून खेळताना प्रभावी कामगिरी केली होती. त्यामुळे आता त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळू शकते.

new-zealand
याशिवाय, न्यूझीलंडने जोश क्लार्कसनलाही पुन्हा संघात स्थान दिले आहे. एप्रिल महिन्यानंतर तो संघाबाहेर होता. त्याने आतापर्यंत न्यूझीलंडकडून सहा एकदिवसीय सामने खेळले आहेत. पाच सामन्यांच्या या मालिकेत भारतीय संघाने २-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारताला पुढील सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी आहे. दुसरीकडे, न्यूझीलंडला मालिका जिंकण्याची संधी नसली तरी उर्वरित दोन्ही सामने जिंकून मालिकेत बरोबरी साधता येऊ शकते. त्यामुळे चौथा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. दरम्यान, भारतीय संघाच्या नेतृत्वातही बदल करण्यात आला असून शुभमन गिलच्या जागी श्रेयस अय्यर कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे.
चौथा एकदिवसीय सामना १३ नोव्हेंबर रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ७.३० वाजता सुरू होणार आहे. चौथ्या सामन्यासाठी न्यूझीलंडचा संघ : मिचेल सँटनर (कर्णधार), फिन अ‍ॅलन, मायकेल ब्रेसवेल, ख्रिश्चन क्लार्क, जेकब डफी, मॅट फिशर, डीन फॉक्सक्रॉफ्ट, मिच हे (यष्टीरक्षक), मॅट हेन्री, काइल जेमिसन, निक केली, ब्रेट रँडेल, टिम सायफर्ट (यष्टीरक्षक), विल यंग. पाचव्या सामन्यासाठी न्यूझीलंडचा संघ : मिचेल सँटनर (कर्णधार), फिन अ‍ॅलन, मायकेल ब्रेसवेल, ख्रिश्चन क्लार्क, जोश क्लार्कसन, जेकब डफी, मॅट फिशर, डीन फॉक्सक्रॉफ्ट, मिच हे (यष्टीरक्षक), निक केली, ब्रेट रँडेल, टिम सायफर्ट (यष्टीरक्षक), ब्लेअर टिकनर, विल यंग.