उत्तर प्रदेश,
bhai-dooj-family-accident-upभाऊबीजेचा दिवस सर्वत्र आनंद, बहिणीच्या चेहऱ्यावरचं हसू, भावाच्या डोळ्यातलं प्रेम. पण उत्तर प्रदेशात मात्र या सणाच्या दिवशी एका कुटुंबावर काळाने असा घाला घातला की, ऐकणाऱ्याच्या काळजाचा ठोका चुकला.
भाऊबीजेच्या दिवशी काळाचा घाला
प्रयागराजचे शिवम उपाध्याय यांनी भाऊबीजेला घरी जाण्याचं ठरवलं होते. पत्नी मेनका, सात आणि पाच वर्षांच्या मुलासह नोएडा येथून प्रयागराजला निघाले होते. छोटंसं, हसतं कुटुंब गाडीत बसताना खुश होतं. गंगा एक्स्प्रेसवेवर गाडी सुसाट निघाली होती. दरम्यान गाडी ही सांडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या भटौली गावाजवळ येताच अचानक नियतीने डाव साधला.
मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगात असलेली कार नियंत्रणाबाहेर गेली आणि थेट रस्त्यावरील डिव्हायडरवर आदळली. धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूक झाला. ही गाडी तब्बल 30 किलोमीटरपर्यंत डिव्हायडरवर घासत गेली. या अपघाताात शिवम आणि मेनका यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्या सात वर्षांचा मुलाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले, पण रुग्णालयात त्याचा मृत्यू असून छोट्या मुलाचाही मृत्यू झाला.
क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त
ज्या घरामध्ये भाऊबीजेचा आनंद साजरा व्हायचा होता, तिथे आता शोककळा पसरली असून संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे.