लंडन,
booker-prize-2026-m-john-harrisonब्रिटिश लेखक एम. जॉन हॅरिसन यांना ‘दी एण्ड ऑफ एव्हरीथिंग’ या कादंबरीसाठी २०२६ चा प्रतिष्ठित बुकर पुरस्कार जाहीर झाला आहे. वयाच्या ८१व्या वर्षी हा पुरस्कार मिळवून त्यांनी बुकर पुरस्काराच्या इतिहासात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या पुरस्काराचे ते आजवरचे सर्वात वयोवृद्ध विजेते ठरले आहेत. हॅरिसन यांना त्यांच्या 'द एंड ऑफ एव्हरीथिंग' या कादंबरीसाठी हा पुरस्कार जाहीर झाला.
लंडन येथे सोमवारी झालेल्या पुरस्कार सोहळ्यात त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. या पुरस्कारासोबत त्यांना ५० हजार पौंड इतकी रक्कम मिळणार आहे.'द एंड ऑफ एव्हरीथिंग' ही विज्ञानकथा आणि डिस्टोपियन अर्थात विनाशानंतरच्या जगाचे चित्रण करणारी कादंबरी आहे. या कादंबरीची कथा इंग्लंडमधील केंट किनारपट्टीवरील विनाशानंतरच्या परिस्थितीवर आधारित आहे. फिलिप टेनेन्ट नावाचा तरुण आपल्या वृद्ध मावशीसोबत राहतो. समुद्रकिनाऱ्यावर वस्तू शोधून तो उदरनिर्वाह करतो. एके दिवशी त्याला आकार बदलू शकणारी एक रहस्यमय वस्तू सापडते. त्यानंतर त्याच्या आयुष्यात अनपेक्षित घटना घडू लागतात.