सिगारेटच्या झुरक्यालाही आता महागाईची झळ!

    दिनांक :12-Nov-2026
Total Views |
मुंबई,
cigarette-price-hikeऑफिसच्या कामातून थोडा वेळ काढून चहा आणि सिगारेटचा 'सुट्टा ब्रेक' घेणाऱ्यांसाठी महागाईचा मोठा झटका बसला आहे. आधीच भाजीपाला, किराणा सामान आणि दुधाच्या दरवाढीने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असताना, आता चहानंतर तुमचा सुट्टा ब्रेकही चांगलाच महाग होणार आहे. तीन दूध कंपन्यांनी प्रति लीटर दोन ते चार रुपयांची वाढ केल्याने आता टपरीवरील चहा महागण्याची चिन्हे आहेत. अशातच आता सिगारेटही महाग झाली आहे.
 
cigarate hike
 
ऑफिसच्या कामातून थोडा वेळ काढून चहा आणि सिगारेटचा 'सुट्टा ब्रेक' घेणाऱ्यांसाठी महागाईचा मोठा झटका बसला आहे. आधीच भाजीपाला, किराणा सामान आणि दुधाच्या दरवाढीने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असताना, आता चहानंतर तुमचा सुट्टा ब्रेकही चांगलाच महाग होणार आहे. तीन दूध कंपन्यांनी प्रति लीटर दोन ते चार रुपयांची वाढ केल्याने आता टपरीवरील चहा महागण्याची चिन्हे आहेत. अशातच आता सिगारेटही महाग झाली आहे.
देशातील सर्वात मोठी एफएमसीजी आणि तंबाखू कंपनी असलेल्या आयटीसीने आपल्या सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या गोल्ड फ्लेक या सिगारेट ब्रँडच्या किमतीत तात्काळ प्रभावाने मोठी वाढ केली आहे. कंपनीने Gold Flake RSFT च्या दरात ही वाढ लागू केली असून, नियमित सिगारेट ओढणाऱ्यांना आता आपल्या खिशाला अधिक झळ सोसावी लागणार आहे.
आयटीसी कंपनीने गोल्ड फ्लेक आरएसएफटी सिगारेटच्या एका पाकिटामागे थेट १० रुपयांची वाढ केली आहे. या ताज्या दरवाढीनंतर, बाजारात आणि पानटपरीवर यापूर्वी १२५ रुपयांना मिळणारे पाकीट आता ग्राहकांना १३५ रुपयांना खरेदी करावे लागणार आहे. म्हणजेच या ब्रँडच्या किमतीत तब्बल ८ टक्क्यांची मोठी उसळी आली आहे.