नवी दिल्ली,
delhi-students-project-vayuदिवाळीच्या पार्श्वभूमीवर हवेची गुणवत्ता हा गेल्या काही दिवसांपासून देशभर चर्चेचा विषय ठरला आहे. पण राजधानी दिल्लीसाठी हवेची गुणवत्ता हा अत्यंत महत्त्वाचा व नागरिकांच्या आरोग्यासाठी कळीचा मुद्दा ठरला आहे. वाढत्या प्रदूषणामुळे दिल्लीतील हवेची गुणवत्ता ढासळल्याचं पाहायला मिळालं आहे. या पार्श्वभूमीवर हवेची गुणवत्ता राखण्यासाठी महागडे एअर प्युरिफायर वापरण्याकडे नागरिकांचा कल दिसून येतो.
पण दिल्लीतल्या दोन विद्यार्थ्यांनी एक असा अनोखा प्रयोग यशस्वी करून दाखवला की ज्यामुळे घरातला एक साधा पंखा महागड्या एअर प्युरीफायरचं काम करू शकेल! त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांचा Diana पुरस्काराने सन्मानदेखील करण्यात आला आहे. त्यांच्या वेबसाईटवर प्रोजेक्ट वायूसंदर्भातली सविस्तर माहिती देण्यात आली आहे.