शेतावरील अवैध अतिक्रमण काढण्यासाठी दोन कोटींची मागणी

डॉक्टर कुटुंबाला दिली मारण्याची धमकी

    दिनांक :12-Nov-2026
Total Views |
सिंदी (रेल्वे),
remove-illegal-encroachment-on-farmland शेतीचा विक्री करारनामा केल्यानंतर खरेदी न करता शेतावर अवैध केलेले अतिक्रमण काढण्यासाठी २ कोटींची मागणी करीत डॉक्टर कुटुंबीया मारण्याची धमकी दिली. ही घटना पारडी शिवारात घडली. डॉ. राजेश शेरके (६४) रा. जबलपूर (मध्यप्रदेश) यांची व त्यांच्या पत्नीच्या नावे पारडी शिवारात शेत सर्वे क्रमांक १९५ आणि २१० मध्ये शेत आहे. त्यांनी ११ नोव्हेंबर २०२५ रोजी युवराज कारमोरे, महादेव वांदिले दोन्ही रा. कानकाटी यांच्या सोबत शेत सर्वे क्रमांक १९५ आणि २१० मधील शेतीचा २ कोटी ४८ लाख ८ हजार ६८० रुपयांमध्ये विक्री करार केला आहे.
 
 
 
त्यापैकी त्यांनी धनादेश आणि रोख, असे १ कोटी रुपये दिले होते. परंतु, काही कारणास्तव खरेदीस विलंब झाला हेाता. दरम्यान, युवराज कारमोरे आणि महादेव वांदिले यांच्या म्हणण्यावरून योगेश साखरकर आणि कमलेश साखरकर रा. सिंदी रेल्वे यांनी शेतात अवैध अतिक्रमण केले. त्यांनी सोयाबीनचे पीकसुद्धा घेतले आता हरभरा पिकाची पेरणी करीत आहे. याबाबत डॉ. शेरके यांनी त्यांना विचारणा केली असता. आरोपींनीच शेतावरील अतिक्रमण काढण्यासाठी दोन कोटींची मागणी केली असून त्यांच्या कुटुंबीयांना मारण्याची धमकी दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.