देवनगर हत्याकांडातील मुख्य आरोपीसह पाच जण अटकेत

- आरोपीला आश्रय देणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

    दिनांक :12-Nov-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
devnagar murder case क्षुल्लक कारणावरून जयभोले सोसायटी, पिपळा फाटा येथे राहणार्‍या अमन उर्फ बॉबी सुनील सपाटे (२७) यांचा खून करणार्‍या मुख्य आरोपीसह पाच जणांना गुन्हे शाखा पथकाने आणि बजाजनगर पोलिसांनी अटक केली. अक्षय किशोर मडावी (२९) फुटाळा वस्ती, पीयूष महेश नेनवानी (३१) अनुपमा माईन स्टोन, जरीपटका रिंग रोड, समीर विजय कावळे (२३, आदिवासीनगर, गिट्टीखदान), आदित्य किशोर कळसकर (१९, नवीन फुटाळा) आणि सुजल राजू सिडाम (२१, जुना फुटाळा) अशी आरोपींची नावे आहेत.
 

devnagar murder case 
 
 
९ नोव्हेंबर रोजी मृतक अमनचा मित्र प्रसाद राऊत याचा वाढदिवस होता. त्यामुळे मध्यरात्री १२.३० च्या सुमारास मृतक अमन, अक्षय गंगाधर नौकरकर हे वाढदिवसाच्या कार्यक्रमाला जात होते. देवनगर चौकाल ज्युस दुकानासमोर अमनच्या मित्राने कार उभी केली. त्यावेळी काही मुले कारसमोर फटाके फोडत होते. अमनने फटाके फोडणार्‍या मुलांना हटकले असता आरोपी अक्षय मडावी व त्याच्या २ ते ३ साथीदारंनी अमनसोबत वाद घातला. त्यानंतर अक्षयने चाकू काढून अमनच्या पोटात खुपसला. गंभीर अवस्थेत त्याला मेयो रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी बजाजनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता.
खून केल्यानंतर अक्षय मडावी हा पीयूष नेनवानी याच्या घरी गेला. त्याला खुनाची माहिती दिली. अक्षयने खून केला हे माहित असूनसुद्धा पियुषने त्याला आश्रय दिला. त्याला मोबाईल, सिम कार्ड देऊन त्याची जेवणाची व्यवस्था केली. मंगळवारच्या पहाटे अक्षय हा प्रतापनगर चौकातील अतिथी रेस्टाँरेंट येथे हजर असताना युनिट २ च्या पथकाचे संजय दहीफडे यांनी त्याला ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून सोनेट कार, डिओ मोपेड, तीन मोबाईल असा १७ लाख २० हजाराचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी दोघांनाही अटक करून बजाजनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. ही कामगिरी गुन्हे शाखेचे मनिष टोंगे, संजय दहीफडे, कमलेश गहलोत यांनी केली.
............
गुन्हेगार मोकाट कसे?
अंबाझरी पोलिसांनी मुख्य आरोपी अक्षय मडावी याच्यावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई केली असती तर हे हत्याकांड घडले नसते. पोलिसांची भीती नसल्यामुळेच २२ गुन्हे दाखल असलेला गुन्हेगार मोकाट फिरत होतो.devnagar murder case गुन्हे शाखेचे पथकसुद्धा अशा गुन्हेगारांकडे डोळेझाक करीत होते. बॉबी सपाटेच्या हत्याकांडात पोलिसांचा निष्काळजीपणा असल्याची चर्चा जोरात आहे.