मुंबई
gold and silver rate today दिवाळीच्या सणादरम्यान सोने आणि चांदीच्या दरांत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत होते. मात्र, भाऊबीजेनंतर या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत घसरण नोंदवण्यात आली आहे. ऑल इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मुंबईतील झवेरी बाजारातून मिळालेल्या माहितीनुसार, कालच्या तुलनेत आज सोन्याचा दर १८५ रुपयांनी, तर चांदीचा दर ३५५ रुपयांनी कमी झाला आहे. हे दर भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११ वाजून २१ मिनिटांचे आहेत.

आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम १४ हजार २९१ रुपये, तर १० ग्रॅमसाठी १ लाख ४२ हजार ९०६ रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम १३ हजार ९० रुपये आणि १० ग्रॅमसाठी १ लाख ३० हजार ९०२ रुपये नोंदवण्यात आला आहे. तर १८ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम १० हजार ७१८ रुपये असून, १० ग्रॅमसाठी १ लाख ७ हजार १७९ रुपये मोजावे लागत आहेत.
चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. आज चांदीचा भाव प्रति ग्रॅम १८८ रुपये, १० ग्रॅमसाठी १ हजार ८८० रुपये, तर एक किलोसाठी १ लाख ८८ हजार १२ रुपये इतका आहे.
सोने आणि चांदीच्या किमतींवर अनेक आंतरराष्ट्रीय तसेच आर्थिक घटकांचा परिणाम होत असतो. अमेरिकन डॉलरमधील चढ-उतार, महागाईचा दर, व्याजदरांमधील बदल, जागतिक अर्थव्यवस्थेतील घडामोडी, आंतरराष्ट्रीय राजकीय तणाव आणि कच्च्या तेलाच्या किमती यांचा मौल्यवान धातूंच्या दरांवर प्रभाव पडतो. याशिवाय, सोने-चांदीमधील गुंतवणुकीची मागणीही त्यांच्या किमती ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थितीनुसार देशांतर्गत बाजारातही या दोन्ही धातूंच्या दरांत चढ-उतार होत असतात.