खुशखबर! दिवाळीनंतर सोने-चांदीचे दर घसरले

    दिनांक :12-Nov-2026
Total Views |
gold-silver-price-drop-todayदिवाळीच्या सणादरम्यान सोने-चांदीच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळत होते. मात्र, भाऊबीजेनंतर दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात घसरण झाल्याचे दिसून येत आहे. ऑल इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मुंबईतील झवेरी बाजारातून मिळालेल्या माहितीनुसार, कालच्या तुलनेत आज सोन्याचे दर 185 रुपयांनी, तर चांदीचे दर 355 रुपयांनी घसरले आहेत. हे दर भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 11:21 वाजताचे आहेत.
 

gold prize low 
सोन्याचे दर –
24 कॅरेट सोने
– 1 ग्रॅम: 14,291 रुपये
– 10 ग्रॅम: 1,42,906 रुपये
22 कॅरेट सोने
– 1 ग्रॅम: 13,090 रुपये
– 10 ग्रॅम: 1,30,902 रुपये
18 कॅरेट सोने
– 1 ग्रॅम: 10,718 रुपये
– 10 ग्रॅम: 1,07,179 रुपये
चांदीचे दर -
चांदी:
- 1 ग्रॅम: 188 रुपये
- 10 ग्रॅम: .1,880 रुपये
- 1 किलो: 1,88,012 रुपये
अमेरिकन डॉलरमधील चढ-उतार, महागाईचा वाढता किंवा घटता दर, व्याजदरातील बदल, जागतिक अर्थव्यवस्थेतील घडामोडी, आंतरराष्ट्रीय राजकीय तणाव, कच्च्या तेलाच्या किमती तसेच सोने-चांदीमधील गुंतवणुकीची मागणी हे सर्व घटक सोने आणि चांदीच्या दरांवर परिणाम करतात.
त्यामुळे सोने-चांदीच्या दरांत चढ-उतार पाहायला मिळतात. कारण या दोन्ही मौल्यवान धातूंचे दर आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींवरही अवलंबून असतात.