मानोरा,
finance companies and banks तालुका अधिकृतपणे दुष्काळग्रस्त घोषित झालेला आहे. दुष्काळामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, हाताला रोजगाराचे कामाचे कोणतेही साधन उपलब्ध नाही. अशा गंभीर परिस्थितीत कुटुंबाचा दैनंदिन उदरनिर्वाह करणे देखील अत्यंत कठीण झाले आहे. त्यामुळे बँक व फायनान्स कंपन्यांच्या कर्ज हप्त्यांच्या वसुलीला तात्काळ स्थगिती देण्यात यावी, अशी मागणीचे निवेदन १२ नोव्हेंबर रोजी आसोला बु. येथील कर्जदार महिलांनी तहसीलदार यांना दिले आहे.
निवेदनात महिलांनी नमूद केले आहे की, आम्ही आमच्या गरजा भागवण्यासाठी शेती कामासाठी ए. यु. फायनान्स कंपनी व ग्रामीण कुटा फायनान्स, अन्नपूर्णा फायनान्स कंपनीचे कर्ज घेतलेले आहे. सध्या आर्थिक चणचण आणि काम नसल्यामुळे बँकेचे, फायनान्स कंपनीचे नियमित कर्जाचे हप्ते भरणे आम्हाला मुळीच शय नाही. अशा संकट समयी बँक आणि फायनान्स कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून हप्ते वसुलीसाठी तगादा लावला जात असून, यामुळे मानसिक तणाव वाढला आहे. काही ठिकाणी घरी येऊन अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याची तक्रारही महिलांनी केली आहे.finance companies and banks शासकीय नियमानुसार आणि दुष्काळी सवलतींचा विचार करता मानोरा तालुयातील सर्व बँका व खाजगी फायनान्स कंपन्यांच्या कर्ज हप्ते वसुलीस तात्काळ स्थगिती देण्यात यावी व संबंधित वित्तीय संस्थांना योग्य ते आदेश देण्यात यावेत, असे निवेदनात नमूद केले आहे.
निवेदनावर मनोज खडसे, विनायक इंगोले, माधुरी श्याम गायकवाड, वर्षा गायकवाड, सुनिता जाधव, वंदना गायकवाड, नंदा खडसे, मीनाक्षी सावळे, जयश्री गायकवाड, मीनाक्षी गायकवाड, मनीषा गायकवाड, सिंधू गायकवाड, संगीता इंगोले, नंदा खाडे, अरुणा टाले, शितल पारधी, सुनिता गायकवाड, रूपाली साबळे, सीमा गायकवाड, दिपाली अंभोरे आदी महिलांच्या स्वाक्षर्या आहेत.