अनैतिक संबंधातून जन्मलेल्या अर्भक नाल्यात फेकले

विणकर कॉलनीतील घटना; सीसीटीव्हीअभावी तपासाचे आव्हान

    दिनांक :12-Nov-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
infant born तांडापेठेतील विणकर कॉलनी परिसरात बुधवारी दुपारी नालीत चार ते पाच महिन्यांचे मृत अर्भक आढळल्याने खळबळ उडाली. पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात चर्चांना उधान आले आहे. अर्भक नालीत कुणी?आणि कोणत्या परिस्थितीत टाकले?, याचा शोध पोलिस घेत आहेत. पोलिसांनी अज्ञात मातेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

infant born 
 
 
११ नोव्हेंबर रोजी दुपारी २.१५ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. निखिल गोनाडे (३४) हे कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडत असताना त्यांना घरासमोरील नालीत अर्भक तरंगताना दिसले. त्यांनी तत्काळ आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक ११२ वर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पाचपावली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृत अर्भक ताब्यात घेतले. प्राथमिक वैद्यकीय अंदाजानुसार, अर्भक चार ते पाच महिन्यांचे असल्याचे समोर आले आहे. अनैतिक संबंधातून गर्भवती राहिल्यानंतर बाळ जन्माची लपवणूक करण्यासाठी अर्भकाला फेकून दिल्याची चर्चा आहे.
 
 
सीसीटीव्हीअभावी तपासात अडचण
अर्भक नालीत टाकणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अनिच्छित गर्भधारणा लपविण्यासाठी अर्भकाची विल्हेवाट लावण्यात आली का? किंवा यामागे अन्य काही कारण आहे का?, या दिशेनेही तपास केला जात आहे. मात्र, घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळ आणि आसपासच्या परिसरात थेट नजर ठेवणारे सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने तपासात अडचणी येत आहेत.infant born पोलिस स्थानिक नागरिकांकडून माहिती घेत असून, परिसरातील प्रसूतिगृहे आणि खासगी रुग्णालयांकडूनही माहिती संकलित केली जात आहे. यासोबतच खबऱ्यांचे जाळे सक्रिय करून अर्भक नालीत टाकणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.