अनिल कांबळे
नागपूर,
prostitution वर्धा शहरात एम.एस्सीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाच्या प्रेमात २१ वर्षीय तरुणी आकंठ बुडाली. दोघांनाही प्रेमसंबंध आणि सोबत जगण्यामरण्याच्या आणाभाका घेतल्या. प्रेमविवाह करुन सुखी संसार थाटण्याची स्वप्न बघितले. पूर्ण विश्वास असलेल्या प्रियकराला दारुचा नाद लागला. त्यासाठी त्याने जीवापाड प्रेम करणाऱ्या प्रेयसीला देहव्यापारात गुंवतले. तिचा प्रेमावरील विश्वास उडाला आणि ती निःशब्द झाली. प्रियकराच्या रुपात साक्षात राक्षस तिच्या नजरेसमोर आला, पोलिसांच्या छाप्यात प्रेयसीला सापडली आणि तिच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली.

वर्धा येथील आर्वी नाका कारला रोडरील दर्श रेसिडेन्सीमध्ये आरोपी प्रियकर तुषार प्रमोद फुलकारी (वय ३२) हा एका नामांकित कॉलेजमध्ये एम.एस्सीचे शिक्षण घेत होता. त्याच कॉलेजमध्ये पुलगाव येथील २१ वर्षीय तरुणी निशा (काल्पनिक नाव) ही बी. एस्सीचे शिक्षण घेत होती. दिसायला अतिशय सुंदर दिसणाऱ्या निशाला तुषारने तिच्याशी मैत्री केली. दोघांचे फोनवर बोलणे आणि इंस्टाग्रामवर प्रेम फुलले. आईवडिलांचे छत्र हरवलेल्या निशाच्या जीवनात पहिल्यांदाच एवढे प्रेम करणारा युवक आला होता. त्यामुळे तिने तुषारवर विश्वास ठेवला. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले. निशा ही तुषारच्या प्रेमापोटी काहीही करायला तयार झाली. तुषारचा फोन येताच ती भान हरपून त्याला भेटायला जायला लागली. प्रेम, आणाभाका आणि लग्नाचे आश्वासनाने निशा भारावून गेली.
..........
दारुची सवय नडली
तुषारच्या प्रेमापोटी निशाने शिक्षण सोडले. आज, उद्या तुषार नक्कीच लग्न करेल, या आशेवर ती होती. यादरम्यान, उच्चशिक्षित तुषारला दारुचे व्यसन जडले. बेरोजगार असलेल्या तुषारने निशाकडे पैसे मागणे सुरु केले. आर्थिक स्थितीने जेमतेम असलेल्या निशाने होते तेवढे पैसे तुषारवर खर्च केले. दारुचे व्यसन भागविण्यासाठी तुषार कर्ज, उसणवारी करायला लागला.
.........
प्रेयसीचा केला ‘सौदा’
तुषारचे व्यसन वाढल्यानंतर त्याने प्रेयसीच्या इभ्रतीचा सौदा केला. निशाला सुरुवातीला मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकायला लागला. मित्रांचे पैसे परत करण्याच्या बदल्यात त्याने प्रेयसीच्या शारीरिक संबंध ठेवण्यास त्याने बाध्य केले. प्रेमात वेडी असलेली निशा ही तुषारच्या सांगण्यावरुन काहीही करीत होती.prostitution शेवटी तुषारने निशाला चक्क देहव्यवसाय करण्यास बाध्य केले. प्रेमापोटी ती देहव्यवसायाच्या दलदलीत फसली.
............
पोलिसांचा छापा आणि ती अडकली
तुषार हा निशाकडून देहव्यापार करवून घेत असल्याची माहिती एसएसबीचे पोलिस निरीक्षक दर्शन पाटील, पोलिस हवालदार प्रकाश माथनकर यांना मिळाली. त्यांनी बोगस ग्राहक पाठवून सापळा रचला. मंगळवारी रात्री छत्रपती चौकात आठ वाजता तुषारने पंटरकडून पैसे घेतल्यानंतर निशाला त्याच्या ताब्यात दिले. लगेच पोलिसांनी छापा घालून तुषार आणि निशाला ताब्यात घेतले. गुन्हा दाखल करुन तुषारला अटक केली तर नि:शब्द झालेली निशा आता महिला सुधारगृहात जीवन कंठत आहे.
..............