मदर डेअरीचे दूध महागणार; ग्राहकांना झटका!

    दिनांक :12-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली,
mother-dairy-milk-price-hikeदिवाळीनंतर सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी एक फटका बसणार आहे. काही दिवसांपूर्वीच अमूलने तूप आणि बटरच्या किमती वाढवल्या होत्या. त्यानंतर आता मदर डेअरीनेही दुधाच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने दुधाच्या प्रकारानुसार प्रतिलिटर २ ते ४ रुपयांपर्यंत दरवाढ केली आहे. हे नवे दर उद्यापासून म्हणजेच गुरुवार पासून लागू होणार आहेत. त्यामुळे दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी परिसरातील (एनसीआर) ग्राहकांना आता रोजच्या दुधासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
 

mother dairy prize hike 
 
मदर डेअरीने वेगवेगळ्या प्रकारच्या दुधाच्या किमती वाढवल्या आहेत. यामध्ये फुल क्रीम दुधाच्या दरात सर्वाधिक ४ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर इतर दुधाच्या दरात २ ते ३ रुपयांची वाढ झाली आहे.
फुल क्रीम दूध (१ लिटर) : आधी ७२ रुपये, आता ७६ रुपये
टोन्ड दूध (१ लिटर पिशवी) : आधी ६० रुपये, आता ६२ रुपये
टोन्ड दूध (मोठ्या प्रमाणातील विक्री, १ लिटर) : आधी ५८ रुपये, आता ६० रुपये
डबल टोन्ड दूध (१ लिटर) : आधी ५४ रुपये, आता ५६ रुपये
गायीचं दूध (१ लिटर) : आधी ६२ रुपये, आता ६५ रुपये