ऑनलाइन मैत्रीचे रूपांतर छळात; कळमना पोलिसांत तरुणाविरुद्ध गुन्हा

    दिनांक :12-Nov-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
online friendship ऑनलाइन ओळखीतून सुरू झालेल्या मैत्रीचे रूपांतर एका तरुणीसाठी मानसिक त्रासात झाल्याची घटना कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. लग्नासाठी दबाव टाकल्यानंतर नकार मिळताच तरुणीचा कार्यालयापासून घरापर्यंत पाठलाग करणे, अश्लील संदेश पाठवणे आणि धमकावणे, असे प्रकार केल्याचा आरोप २४ वर्षीय तरुणावर आहे.
 
online friendship
 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ वर्षीय तरुणीची ऑनलाइन माध्यमातून दानिश अक्रम (२४) याच्याशी ओळख झाली होती. काही दिवसांनंतर आरोपीने तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. मात्र, तरुणीने लग्नास नकार दिला. त्यानंतर आरोपीने तिचा कार्यालयापासून घरापर्यंत पाठलाग करून तिला त्रास देण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे. ९ नोव्हेंबर रोजी आरोपीने रस्त्यात तरुणीला धमकावले आणि तिचा हात जबरदस्तीने पकडून ओढण्याचा प्रयत्न केला. याशिवाय व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामवर अश्लील संदेश पाठवून शिवीगाळ व धमक्या दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून कलमना पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.