हिंदी कलाकारांना डोक्यावर घेता, मग मराठी ज्येष्ठ कलाकारांना दुय्यम वागणूक का?

    दिनांक :12-Nov-2026
Total Views |
मुंबई
subodh bhave मराठमोळा लोकप्रिय अभिनेता सुबोध भावे यांनी आपल्या कारकिर्दित केवळ मराठीच नाही तर हिंदी सिनेमातही उत्तम अभिनयामुळे आपलं नाव केलं आहे. स्पष्टवक्तेपणासाठी सुबोध भावे ओळखला जातो. त्याने अनेकदा कलाकारांना मिळणाऱ्या मान-सन्मानावर परखडपणे भाष्य केलं आहे. कोणत्याही कार्यक्रमात ज्येष्ठ मराठी कलाकारांपेक्षा हिंदीतल्या नवख्या कलाकारांच्या तुलनेत दुय्यम वागणूक दिली जाते, याचा राग येत असल्याचं सुबोध भावेनं म्हटलंय.
 

subodh bhave slams discrimination against marathi actors, says hindi film stars get more respect 
सुबोध नेमका काय म्हणाला?
सुबोध अलीकडेच Mehek Ankar यांच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाला होता. यावेळी त्याने अनेक किस्से शेअर करत मराठी कलाकारांना मिळत असलेल्या वागणूकीवर भाष्य केलंय. तो म्हणाला की, ‘जर कोणता कलाकार महाराष्ट्रातील किंवा इतर कार्यक्रमात येतो. त्याच्यासोबत एखादा मराठी कलाकार असेल, ज्याने आपल्या आयुष्यातील जवळपास 40 वर्षे या सिनेमासृष्टीत घालवली आहेत, जो कमालीचा अभिनेता आहे’. पण दुसऱ्या कलाकाराने केवळ हिंदी सिनेमात काम केलं म्हणून त्या व्यक्तीला तुम्हील डोक्यावर घेता.
त्याचवेळी मराठी कलाकार मागे गर्दीत स्वत:ला शोधत असतो. तो जबरदस्त ऍक्टर आहे. ज्येष्ठ कलाकार आहे. पण त्याने हिंदी सिनेमांमध्ये काम केलं नाही म्हणून… अशी स्थिती पाहिली तर प्रचंड राग येतो. प्रत्येकाचा आपला सन्मान असतो. आपण तो आदर द्यायला हवा. सन्मान करायला हवा. जिथे यथोचित सन्मान दिला जात नाही, तिथे मग प्रचंड राग येतो’, असं सुबोध भावे म्हणाले.