मानोरा,
cremation ground green तालुक्यातील माहुली येथील युवकांनी गावातील स्मशानभूमी हरित करण्याचा संकल्प राबवून पर्यावरण संवर्धन संरक्षण व संगोपन करिता संकल्प केला असून, गावातील शासकीय निमशासकीय व प्रतिष्ठित व्यक्तींकडून आर्थिक सहाय्यता घेऊन माहुली येथील स्मशानभूमी मध्ये बहुउपयोगी वृक्षांची लागवड केली आहे. यामध्ये कडूनिंब, बेल, कांचन, अर्जुन, कदम, बकुळ, अशोका, वड, कदम, जांभूळ अशा विविध झाडांची निवड करून पुढील भविष्याच्या दृष्टिकोनातून झाडाची निवड केली. ज्यापासून पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लागेल तसेच पशु पक्षांसाठी अन्न व निवारा यांची सुद्धा सोय होणार आहे.
झाडांची लागवड करताना प्रत्येक झाडाची उंची साधारण आठ ते दहा फुटांची झाडांची निवड केली असून, प्रत्येक झाडाला हवा किंवा वार्यामुळे वाकणार नाही याकरिता काठी तसेच मुख प्राण्यापासून संरक्षण व्हावे यासाठी ट्री गार्ड सुद्धा बसविण्यात आले आहे. झाडांना पाणी देण्यासाठी आळे तयार केले आहेत.cremation ground green वृक्ष लागवड करून न सोडता वृक्षाचे संगोपन संवर्धन व संरक्षणाची जबाबदारी वनश्री निखिल चव्हाण स्वतः व यांच्या मार्गदर्शनाखाली मनोहर जाधव, करण जाधव, रितेश राठोड, आकाश जाधव या युवकांनी जबाबदारी घेतली आहे. या संकल्पकरिता माहुली गावातील प्रकाश राठोड, शेषराव आडे, राम राठोड, ओम प्रकाश सावंत, पंडित जाधव, अमोल पवार, हुकूम आडे, अरविंद राठोड, निलेश राठोड, ,सुजित आडे, बबन राठोड, खुशाल आडे, गजानन राठोड, ज्योतीलाल राठोड, सुमीत राठोड यांचे सहकार्य लाभले.