सावधान! १६ नोव्हेंबरला चक्री वादळ धडकणार...

    दिनांक :13-Nov-2026
Total Views |
मुंबई,
bay-of-bengal-cyclone-rain-alertदक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. या क्षेत्राची तीव्रता वाढून 14 नोव्हेंबर रोजी अधिक कमी दाबाच्या क्षेत्रात आणि 15 नोव्हेंबर रोजी चक्रीवादळपूर्व स्थितीतील रूपांतर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर उत्तर पश्चिम दिशेने कमी दाबाचा पट्टा पुढे सरकेल आणि 16 नोव्हेंबरच्या संध्याकाळी मध्य बंगालवर चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसातील हे तिसरं चक्रीवादळ असणार आहे. या चक्रीवादळामुळे अनेक राज्यात मुसळधार पाऊस होणार आहे. त्यामुळे अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
 

cyclone on 16 
हवामान खात्याने याबाबतची माहिती दिली आहे. चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओडिशा सारख्या राज्यात मुसळधार पाऊस होणार आहे. दक्षिण भारतात 13 ते 15 नोव्हेंबर आणि 16 ते 19 नोव्हेंबरच्या दरम्यान, तामिळनाडू, पुद्दुचेरी, काईकल, 13-15 नोव्हेंबरच्या दरम्यान केरळ, 13-19 नोव्हेंरब दरम्यान लक्षद्वीप, 14-19 नोव्हेंबरच्या दरम्यान आंध्र प्रदेशची किनारपट्टी, यनम, रायलसीमामध्ये मुसळधार पाऊस होणार आहे. 15 नोव्हेंबर रोजी तमिळनाडु, पुद्दुचेरी, कराईकल, 16-19 नोव्हेंबरच्या दरम्यान केरळमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. 18-19 नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेशाची किनारपट्टी आणि यनममध्ये मुसळधार पाऊस होणार आहे.
पूर्व भारतालाही अलर्ट जारी करण्यात आला आहे. 13 ते 19 नोव्हेंबर दरम्यान अंदमान आणि निकोबार द्वीपमध्ये अतिमुसळधार पाऊस कोसळणार आहे. 18-19 नोव्हेंबर रोजी गंगेच्या मैदानी पश्चिम बंगाल, ओडिशात पाऊस होणार आहे. 13-17 नोव्हेंबर दरम्यान अंदमान आणि निकोबार बेट समूहामध्ये मेघगर्जनेसह पाऊस होणार आहे. विजांचा कडकडटा होणार असून या भागात वेगाने वारे वाहणार आहेत. याशिवाय 18-19 नोव्हेंबर दरम्यान अंदमान आणि निकोबार बेट, 19 नोव्हेंबर रोजी पश्चिम बंगालमद्ये प्रचंड वारे वाहणार आहेत. 13-16 दरम्यान अंदमान आणि निकोबार बेटावर प्रचंड पाऊस होणार आहे. 18-19 नोव्हेंबर रोजी ओडिशात मुसळधार पाऊस होणार आहे.