मध्यरात्री घरात घुसून तरुणीला प्रेमाची मागणी

आजोबांना जीवे मारण्याची धमकी

    दिनांक :13-Nov-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
crime news प्रेमाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून दोन तरुणांनी घरात घुसून वृद्ध दाम्पत्याला मारहाण केली, तसेच त्यांच्या १६ वर्षीय नातीचा विनयभंग केल्याची घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. ११ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी साजन यादव (१९) आणि चंदन यादव (२४) या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्यांतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे.

crime news 
 
 
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, तक्रारदार ५५ वर्षीय व्यक्ती असून आरोपी साजन हा त्यांच्या अल्पवयीन नातीचा वारंवार पाठलाग करीत होता. मुलीची इच्छा नसतानाही तो तिच्यावरील प्रेम व्यक्त करीत असल्याचा आरोप आहे. दिवाळीच्या सणासाठी आजोबांनी नातीला आपल्या घरी आणले होते. याचवेळी दोन्ही आरोपी कोणतीही परवानगी न घेता घरात घुसले. घरात शिरल्यानंतर आरोपींनी तक्रारदार आणि त्यांच्या पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी साजनने अल्पवयीन मुलीजवळ जाऊन ती आपल्याशी का बोलत नाही, अशी विचारणा केली. त्यानंतर पुन्हा प्रेम व्यक्त करीत तिचा हात चुकीच्या उद्देशाने पकडल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. घरातून बाहेर पडताना आरोपींनी वृद्धाला शिवीगाळ केली. आपण सांगितल्याप्रमाणे वागले नाही, तर जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.crime news या घटनेनंतर मुलीच्या आजोबांनी एमआयडीसी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.