बाजारगाव येथील प्रसिद्ध ‘अनंतारा हॉटेल’ला भीषण आग; एकाचा मृत्यू

नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर एकच खळबळ; सोलार एक्सप्लोसिव्हच्या पाण्याच्या टँकरसह कोंढाळी नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे प्रयत्न

    दिनांक :13-Nov-2026
Total Views |
नागपूर,
anantara hotel अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील औद्योगिक गाव बाजारगाव येथील प्रसिद्ध ‘अनंतारा हॉटेल’ला गुरुवारी, १२ नोव्हेंबर रोजी रात्री साडेसात ते पावणेआठच्या सुमारास भीषण आग लागली. आगीचे स्वरूप अत्यंत गंभीर असल्याने हॉटेलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचेही वृत्त आहे. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
 

anantara hotel 
 
 
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गुरुवारी रात्री अचानक अनंतारा हॉटेलमधून आगीच्या मोठ्या ज्वाळा दिसू लागल्या. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच कोंढाळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सोलार एक्सप्लोसिव्ह, बाजारगाव यांचा पाण्याचा टँकर तसेच कोंढाळी नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न केले. मात्र, आगीची तीव्रता अधिक असल्याने हॉटेलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
आगीत एका व्यक्तीचा मृत्यू
या भीषण आगीत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मृत व्यक्ती अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील रहिवासी असून, ते महसूल विभागात मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे. मृत व्यक्तीची ओळख आणि पदाबाबत नागपूर ग्रामीण तहसील कार्यालयातील नायब तहसीलदारांकडून अधिकृत माहिती देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
आगीचे कारण अद्याप अस्पष्ट
अनंतारा हॉटेलला आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक स्तरावर शॉर्टसर्किट किंवा अन्य कारणांमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.anantara hotel मात्र, आगीचे नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. या दुर्घटनेत झालेल्या आर्थिक नुकसानीचा अंदाजही संबंधित विभागांकडून घेतला जाणार आहे.
राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या या प्रसिद्ध हॉटेलमध्ये घडलेल्या आगीच्या घटनेमुळे परिसरातील अग्निसुरक्षा व्यवस्था आणि अग्निशमन सुविधांबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलीस आणि संबंधित विभागांकडून करण्यात येणारी चौकशी तसेच ॅघटनास्थळाच्या पंचनाम्यानंतर या दुर्घटनेचे नेमके कारण आणि नुकसानीची माहिती स्पष्ट होणार आहे.