नागपूरातील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र ऊट्टलवार यांचे निधन

    दिनांक :13-Nov-2026
Total Views |

नागपूर,
nagpur-journalist-rajendra-uttalwar-passes-awayसचिदानंद नगर येथील रहिवासी राजेंद्र उट्टलवार यांचे आज शुक्रवार दिनांक 13 नोव्हेंबर 26 रोजी निरामय हॉस्पिटलमध्ये पहाटे दुःखद निधन झाले. ते ५८ वर्षाचे होते. विदर्भातील पत्रकारितेच्या क्षेत्रात एक अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांची ओळख होती. नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे त्यांनी सदस्यत्व भूषविले होते.
 

journalist pass away 
पत्रकतेप्रती असलेली निष्ठा, कामाप्रती समर्पण आणि प्रतिकूल परिस्थितीतही शेवटच्या क्षणापर्यंत सुरू ठेवलेले पत्रकारितेचे व्रत ही त्यांची ओळख होती. आजारपणाशी झुंज देतानाही त्यांनी पत्रकारितेतील आपली जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न केला.
त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, आई आणि बहीण एवढा परिवार आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच पत्रकारिता क्षेत्रातील सहकारी, मित्र परिवार आणि विविध स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनाने एक अनुभवी, कर्तव्यनिष्ठ आणि पत्रकारितेशी अखेरपर्यंत प्रामाणिक राहिलेला पत्रकार काळाच्या पडद्याआड गेला आहे.