प्रा. आ. केंद्र उंबर्डा बाजार गुणवत्ता निर्देशांकामध्ये उत्तीर्ण

राष्ट्रीय मानकासाठी पात्र

    दिनांक :13-Nov-2026
Total Views |
उंबर्डा बाजार,
umbarda bazar जिल्हा आरोग्य अधिकारी पांडुरंग ठोंबरे यांच्या संकल्पनेतून व तालुका आरोग्य अधिकारी शंकर नांदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून राष्ट्रीय गुणवत्ता नामांकन सेवा अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र उंबर्डा बाजार या संस्थेचे राज्यस्तरावरून मूल्यमापन करण्यात आले. यामध्ये सहा विभाग व आठ सेवा यांबाबत राज्यस्तरावरून काटेकोरपणे व अचूकपणे तपासणी करण्यात आली. सदर तपासणीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र उंबर्डा बाजार यांनी सहाही विभागाचे उत्कृष्ठ सादरीकरण करून गुणवत्तापूर्वक सेवा देत असल्याचे सिद्ध करून दाखवले. त्यामुळे राज्यस्तरीय चमुने प्राथमिक आरोग्य केंद्र उंबर्डा बाजार येथील संस्थेतील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक करून सदर संस्था राष्ट्रीय पातळीवर पात्र केली. यामुळे वाशीम जिल्ह्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र उंबर्डा बाजारने उत्कृष्ठ कामगिरी केली आहे.
 

umbarda bazar 
 
 
सदर कार्यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी पांडुरंग ठोंबरे यांचा गुणवत्ता व सातत्य हा कारणीभूत असून, याबाबत तालुका आरोग्य अधिकारी शंकर नांदे यांनी पाठपुरावा केल्यामुळे यश संपादन झाले आहे. सदर नामांकन करता प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यश ढाकरे व राधिका बियाणी यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून आरोग्य संस्था पात्र करण्याकरता प्रयत्न केले. त्यांच्या मदतीला तालुक्यातील समुदाय आरोग्य अधिकारी सपना जेसवाणी व अभिलाषा लकडे यांनी एनयुएएस पात्रता करता विशेष प्रयत्न केले.
प्राथमिक आरोग्य केंद्र उंबर्डा बाजार येथील समुदाय आरोग्य अधिकारी प्रीतम आडे, डॉ. सुषमा भगत, डॉ. संतोष बिबीनायके, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी विनोद देशपांडे, औषध निर्माण अधिकारी मनीष ढगे, कनिष्ठ लिपिक लीना राऊत, आरोग्य सहाय्यक जितेंद्र महाजन, योगीराज ढवक, आरोग्य सहायिका हेमलता सातपुते, आरोग्य सेविका राठोड, लसनकुटे, भगत, नेमाने व आरोग्य सेवक शुभम घुगे, नितीन चिरडे, किशोर शिंदे, अनिकेत तुमसरे, आशिष भिसे यांचे सहकार्य लाभले.umbarda bazar या यशाबद्दल ग्रामस्थाकडून प्राथमिक आरोग्य केंद्र उंबर्डा बाजार व तालुका आरोग्य अधिकारी शंकर नांदे यांचे परीसरात कौतुक केले जात आहे.