शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय!

ई-पीक पाहणी नोंदणीला ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

    दिनांक :14-Nov-2026
Total Views |
मुंबई,
e-peak राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ई-फेरफार पीक पाहणी नोंदणीची मुदत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत घोषणा केली. पीक नोंदी अचूक पद्धतीने पूर्ण व्हाव्यात आणि शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येऊ नयेत, या उद्देशाने ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
 
e-peak
 
महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांना आता ३० नोव्हेंबरपर्यंत ई-पीक पाहणीची नोंदणी करता येणार आहे. तांत्रिक अडचणी, जीओ लोकेशनमधील त्रुटी, गावांच्या नकाशांमधील तफावत तसेच गट क्रमांकासंदर्भातील समस्यांमुळे अनेक शेतकऱ्यांची नोंदणी रखडली होती. त्यामुळे या मुदतवाढीचा अशा शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.
 
नोंदणी प्रक्रिया अधिक वेगाने पूर्ण व्हावी यासाठी तलाठी स्तरावर आवश्यक कार्यवाहीला गती देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांनी वाढीव मुदतीचा लाभ घेत ३० नोव्हेंबरपूर्वी आपल्या शेतातील पिकांची नोंदणी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.