शेतकऱ्यांसाठी सरकारची मोठी घोषणा!

ई-पीक पाहणीच्या नोंदणीसाठी मुदतवाढ

    दिनांक :14-Nov-2026
Total Views |
मुंबई,
e-peek-pahani-deadline-extendedबळीराजाला दिलासा देणारा महत्वाचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. ऐन दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ई फेरफार पीक पाहणीला मुदवाढ देण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली. पीक नोंदी अचूक करून सरकारी योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
 

e peek pahani 
राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत फडणवीस सरकारने ई-पीक पाहणीच्या नोंदणीसाठी मुदतवाढ देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे विविध तांत्रिक अडचणींमुळे अद्याप पीक नोंदणी करू न शकलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
 
राज्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची अचूक नोंद ई-पीक पाहणी प्रणालीमध्ये करणे आवश्यक आहे. या नोंदींच्या आधारे शासनाच्या विविध कृषीविषयक योजनांचा लाभ, अनुदान तसेच इतर शासकीय सवलती मिळवताना मदत होते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतातील प्रत्यक्ष पीक परिस्थितीची अचूक नोंद होणे महत्त्वाचे आहे.