india-us-trade-deal-updateभारत आणि अमेरिका यांच्यात गेल्या काही दिवसांपासून तणाव आहे. भारतावर मोठा टॅरिफ पुन्हा एकदा लावण्याच्या तयारीत अमेरिका होती. मात्र, त्यांनी पुन्हा माघार घेतली. काही दिवसांपूर्वीच भारतावर अमेरिकेने थोडा थोडका नाही तर तब्बल 200 टक्के टॅरिफ लावला. ज्यामुळे भारतीय वस्तू अमेरिकेच्या मार्केटमध्ये पाठवणेही कठीण झाले. या टॅरिफचा मोठा परिणाम होताना दिसला. भारताने हे नुकसान भरून काढण्यासाठी अनेक देशांसोबत मुक्त व्यापार करार केला. त्यातच भारत आणि अमेरिकेतील व्यापार करारही अडकला आहे. मध्यंतरी दोन्ही देशात चर्चा सुरू होती. मात्र, करारापर्यंत पोहोचण्यात यश मिळाले नाही. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारावर मोठे विधान केले.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले की, भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करार लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या कराराशी संबंधित बहुतेक प्रश्न निकाली निघाले आहेत. जे काही थोडे प्रश्न शिल्लक आहेत, ते प्रामुख्याने भारताच्या बाजूने नसून अमेरिकेच्या बाजूने आहेत. जयशंकर यांच्या बोलण्यातून हे स्पष्ट झाले की, भारत अमेरिकेसोबत व्यापार करण्यासाठी तयार आहे.
हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, दोन्ही देशांचे उद्दिष्ट अशा व्यापार करारापर्यंत पोहोचणे आहे, जे दोन्ही देशांसाठी फायदेशीर असणार आहेत. परस्पर फायदेशीर आणि संतुलित असेल. विशेष म्हणजे या व्यापार करारात आम्ही अंतिम टप्प्यात आहोत. यात काही लपवण्यासारखे नाहीये. आम्ही सतत अमेरिकेच्या संपर्कात आहोत.
वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्याशी सतत संपर्कात आहोत. लवकरच भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करार होईल. मागील काही दिवसांपासून भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करार झाला नाहीये. अमेरिकेचे शिष्टमंडळ भारतात व्यापार करार करण्यासाठी आले देखील होते. मात्र, दोन्ही देशात करार हा होऊ शकला नाही. काही मुद्द्यात दोन्ही देशांमध्ये सहमती होत नव्हती. शेवटी दोन्ही देशांमधील करार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. लवकरच याबाबत मोठी घोषणा होऊ शकते.