प्रियकराच्या मित्राने केला तरुणीवर बलात्कार

ब्लॅकमेल करुन लैंगिक शोषण; लैंगिक अत्याचाराला कंटाळून पोलिसांत धाव

    दिनांक :14-Nov-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
khaparkheda-assault-caseप्रेमसंबंधांची माहिती सार्वजनिक करून बदनामी करण्याची धमकी देत एका २० वर्षीय तरुणीवर प्रियकराच्या मित्रानेच बलात्कार केल्याची घटना खापरखेडा परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नितेश अशोक भोयर (२८) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
 
harrasment
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीचे गौरव नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध असून, ती गेल्या वर्षभरापासून खापरखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत त्याच्या घरी ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत होती. याच परिसरात राहणाऱ्या प्रियकराच्या मित्राची तरुणीवर काही महिन्यांपासून नजर होती. तो तिला वारंवार फोन करून त्रास देत होता. तरुणीने त्याच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर माझ्याशी प्रेमसंबंध असल्याचे सांगून बदनामी करण्याची धमकी आरोपी देत होता.
बदनामीच्या भीतीचा गैरफायदा घेत आरोपीने १७ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ११ वाजता तरुणीच्या घरात प्रवेश केला आणि तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर ११ ऑक्टोबर रोजी आरोपीने तरुणीशी पुन्हा संपर्क साधला. तिला सावनेर बसस्थानकाजवळ बोलावून घेतले. तेथून दुचाकीवरून तिला खापा येथे नेले आणि पुन्हा अत्याचार केल्याचा आरोप आहे. सततचा छळ आणि अत्याचाराला कंटाळून तरुणीने अखेर १२ नोव्हेंबर रोजी खापरखेडा पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
बदनामीच्या भीतीचा गैरफायदा
प्रियकराच्या मित्राशी असलेले अनैतिक संबंध उघड होण्याची भीती दाखवून एखाद्या व्यक्तीवर दबाव आणणे आणि तिच्या इच्छेविरुद्ध कृत्य करण्यास भाग पाडणे, हा गंभीर प्रकार आहे. सामाजिक बदनामीच्या भीतीमुळे पीडित व्यक्ती अनेकदा तक्रार करण्यास धजावत नाही. या प्रकरणातही वारंवार छळ सहन केल्यानंतर तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली. त्यामुळे आरोपीला धडा शिकविण्यात यश आले.