आढावा बैठकीनंतर आ. बकाने थेट कालव्यावर

    दिनांक :14-Nov-2026
Total Views |
देवळी,
MLA Rajesh Bakane
निम्न वर्धा धरणाच्या कालव्यातून रब्बी हंगामासाठी ६ नोव्हेंबरपासून पाणी सोडण्यात आले. मात्र, पाणी सोडून अनेक दिवस उलटले असून आता पाणी बंद करण्याची वेळ येऊन ठेपली असतानाही काही भागांतील शेतांपर्यंत पाणी पोहोचले नसल्याचे पुढे आले. देवळी,

MLA Rajesh Bakane निम्न वर्धा धरणाच्या कालव्यातून रब्बी हंगामासाठी ६ नोव्हेंबरपासून पाणी सोडण्यात आले. मात्र, पाणी सोडून अनेक दिवस उलटले असून आता पाणी बंद करण्याची वेळ येऊन ठेपली असतानाही काही भागांतील शेतांपर्यंत पाणी पोहोचले नसल्याचे पुढे आले. त्याची दखल घेत आ. राजेश बकाने यांनी प्रथम आढावा बैठकीच्या माध्यमातून संबंधित अधिकार्यांकडून माहिती घेतली. बैठकीत समाधान न झाल्याने त्यांनी स्वतः कालव्यावर पोहोचत परिस्थितीची पाहणी केली. शेतकर्यांना पाणी का मिळाले नाही असा अधिकार्यांना जाब विचारत तीव्र नाराजी व्यक्त केली.




आ. बकाने यांनी निम्न वर्धा प्रकल्पाच्या अभियंत्यांना सोबत घेत भिडी, शिरपूर, खर्डा, वाबगाव, आंबोडा, कानगाव, नांदगाव आणि चाणकी या परिसरातील कालव्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. कालव्यातून पाणी सोडण्यात आले असतानाही काही भागांमध्ये पाणी शेतापर्यंत पोहोचले नसल्याच्या शेतकर्यांच्या तक्रारी त्यांनी प्रत्यक्ष ऐकून घेतल्या.

कालव्याच्या पाणी वितरणात होणारी दिरंगाई ही केवळ प्रशासकीय बाब नसून शेतकर्यांच्या आर्थिक हिताशी संबंधित असल्याचे त्यांनी अधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिले.ज्या भागातील शेतकर्यांना अद्याप पाणी मिळालेले नाही, त्या भागातील परिस्थिती गांभीर्याने तपासून शेतकर्यांना न्याय देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

निम्न वर्धा धरणाचे पाणी शेतकर्यांसाठी उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे कालव्यात पाणी सोडले म्हणजे प्रशासनाची जबाबदारी संपत नाही. धरणापासून कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत आणि तेथून प्रत्येक शेतकर्याच्या शेतापर्यंत पाणी पोहोचविण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणेची असल्याचे त्यांनी अधिकार्यांच्या लक्षात आणून दिले.
शेतकर्यांना वेळेत पाणी मिळणे हा त्यांचा हक्क आहे. पाणी सोडण्याचे नियोजन करताना शेवटच्या टोकावरील शेतकर्यांचाही विचार झाला पाहिजे. यापुढे पाणी वितरणात अशा प्रकारच्या अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी संबंधित विभागाने अधिक जबाबदारीने काम करावे, अशी अपेक्षाही आ. बकाने यांनी व्यक्त केली.


बैठकीत माहिती आणि प्रत्यक्ष परिस्थितीत तफावत!

६ नोव्हेंबरपासून कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले. आता पाणी बंद करण्याची वेळ जवळ आली तरी काही शेतकर्यांना पाणी मिळालेले नाही, ही बाब लक्षात येताच आ. बकाने यांनी संताप व्यक्त केला. कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी का पोहोचले नाही? संबंधित यंत्रणेकडून याबाबत वेळेत उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत? असे सवाल त्यांनी अधिकार्यांना केले. यावेळी त्यांना तफावत आढळून आल्याने त्यांनी अधिकार्यांना चांगलेच फटकारले.