अनिल कांबळे
नागपूर,
nagpur-pocso-assault-cas
दुसऱ्या पतीसोबत राहताना आईचे जळगावमधील युवकाशी सूत जुळले. दोघांचे प्रेमसंबंध जुळल्यानंतर तो नागपुरात भेटायला आला. त्याने विवाहित प्रेयसीच्या १५ वर्षीय मुलीला जेवण करायला नेण्याच्या बहाण्याने लॉजवर नेऊन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. ही धक्कादायक घटना गणेशपेठ परिसरात उघडकीस आली. या प्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची आईच्या आईचे दोन लग्न झाले आहेत. दरम्यान तिचे जळगाव येथे राहणाऱ्या एका ३२ वर्षीय युवकाशी सूत जुळले. तो प्रेयसीला भेटायला नेहमी नागपुरात येत होता. यादरम्यान, प्रेयसी तिच्या दुसऱ्या पतीकडून गर्भवती झाली. तिली प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल केले होते. त्यामुळे मुलीची देखभाल करण्यासाठी घरात प्रौढ व्यक्ती नव्हती. तिने आपल्या प्रियकराला जळगाववरुन नागपुरात बोलावले. आरोपीने याच परिस्थितीचा फायदा घेतला. ८ ते ९ नोव्हेंबरदरम्यान आरोपीने मुलीला हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने घराबाहेर नेले. त्यानंतर तिला कॉटन मार्केट परिसरातील एका लॉजवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
एवढ्यावरच न थांबता आरोपीने गणेशपेठ बसस्थानकाजवळील तिच्या घरीही तिच्यावर पुन्हा अत्याचार केल्याचे पोलिसांनी सांगितले.या घटनेनंतर भयभीत झालेल्या मुलीने अखेर धाडस करून कुटुंबीयांना आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी गणेशपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
आई रुग्णालयात, मुलगी असुरक्षित
आईच्या प्रसूतीच्या काळात घरातील मोठी व्यक्ती सोबत नसल्याने १४ वर्षीय मुलगी असुरक्षित होती. कुटुंबाशी असलेल्या परिचयाचा गैरफायदा घेत आरोपीने तिचा विश्वास संपादन करून तिला बाहेर नेले आणि अत्याचार केल्याचा आरोप असल्याने या घटनेने परिसरात संताप व्यक्त होत आहे.