अमेरिका,
us-flights-suspended-resumedशुक्रवारी दुपारी अमेरिकेतील हवाई वाहतूक अचानक ठप्प झाली. संपुर्ण अमेरिकेतील विमान वाहतूक विस्कळीत झाली आणि सर्व विमानांचे उड्डाण थांबवण्यात आले. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवासी विमानतळावर अडकले. देशभरातील विमानतळांवरून उड्डाण करणारी सर्व विमाने त्वरित थांबवण्यात आली. अमेरिकेत नक्की काय घडतंय, अशी जोरदार चर्चा ही रंगताना दिसली. आता काही तासानंतर ही बंदी उठवण्यात आली. अमेरिकेतील विमान सेवा ही पुन्हा पुर्ववत सुरू झाली. फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने (FAA) एअर ट्रॅफिक कंट्रोल केंद्रांमध्ये उद्भवलेल्या एका गंभीर तांत्रिक बिघाडामुळे हा निर्णय घेतला होता. अशीही चर्चा रंगताना दिसली की, सायबर हल्ला अमेरिकेवर झाला असून त्यामुळे विमान उड्डाणे पूर्णपणे थांबवण्यात आली.
अमेरिकेवर इतका मोठा सायबर हल्ला झाला की, त्यांनी थेट विमान सेवाच थांबवली, ज्याने जगात एकच खळबळ उडावी. अमेरिकेवरील 9\11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदा पूर्ण विमानसेवा थांबवण्यात आली. पण अमेरिकेने स्पष्ट केले की, कोणत्याही प्रकारचा सायबर हल्ला झाला नाहीये. तांत्रिक बिघाडामुळे विमान सेवा थांबवण्यात आली.
देशभरातील 22 एअर ट्रॅफिक कंट्रोल केंद्रांवर दळणवळण प्रणालीमध्ये समस्या उद्भवली. ज्यामुळे विमानांची येजा थांबवावी लागली. अचानक घेतलेल्या निर्णयामुळे अमेरिकेतील विविध विमानतळांवर हजारो प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. तांत्रिक बिघाडामुळे देशभरातील 22 एअर ट्रॅफिक कंट्रोल सेंटर्सवर परिणाम झाला होता.
ही केंद्रे विविध विमानतळांदरम्यान उड्डाण करणाऱ्या विमानांना मार्गदर्शन करण्याचे आणि त्यांच्या हालचालींचे व्यवस्थापन करण्याचे काम करतात. तिथेच तांत्रिक बिघाड आल्याने सर्व विमानांचे उड्डाण थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. अमेरिकेत घडलेल्या या तांत्रिक बिघाडामुळे अनेक विमान कंपन्यांवर त्याचा परिणाम झाला. पूर्ण विमान सेवा विस्कळीत झाली. कोणत्याच विमानाचे उड्डाण झाले नाही. प्रवासी मोठ्या प्रमाणात विमानतळावर अडकले होते.