अंधेरी ते वांद्रे प्रवास आता काही मिनिटांत!

    दिनांक :15-Nov-2026
Total Views |

मुंबई,
andheri-bandra-metro-2bमुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. रोज अंधेरी ते वांद्रे ट्रॅफिकमध्ये तासन् तास अडकणाऱ्यांसाठी मेट्रो 2B हा मोठा दिलासा ठरणार आहे. या मार्गातील सर्वात अवघड तसेच चर्चेत असलेलं काम हे आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे. जुहू सर्कजवळील ईएसआयसी स्थानकाजवळ गर्डर बसवण्याचं सध्या काम हे जवळपास संपलं आहे. खरं तर एमएमारडीएने यासाठी 18 नोव्हेंबरची डेडलाईन ठेवलेली होती. रात्रीच्या वेळी गुलमोहर रोडवरील वाहतूक थांबवून हे काम केलं जात आहे. जेणेकरुन दिवसाच्या वाहतूकीला त्रास होणार नाही.
 

andheri metro 
 
सध्या अंधेरी ते वांद्रे या दरम्यानच्या असलेल्या कामांपैकी 75 टक्के काम हे पूर्ण झालं आहे. अंधेरी पश्चिम ते सारस्वत नगर हा 7.53 किलोमीटरचा पहिला टप्पा हा मार्च 2027 पर्यंत सुरु करण्याचं नियोजन आहे. पण काही तांत्रिक अडचणींमुळे हे काम पावसाळ्यापर्यांत लांबू शकतं, अशीही चर्चा आहे.
 
दुसरीकडे सारस्वतनगर ते चेंबूर हा 10.03 किलोमीटरचा दुसरा टप्पा 2028 पर्यंत सुरु होईल,अशी माहिती मिळत आहे.सध्या दहिसर ते अंधेरी पश्चिम आणि मंडाले ते चेंबूर हे मार्ग सुरू आहेत. हा पूर्ण मार्ग सुरू झाला की अंधेरी-वांद्रेचा प्रवास अवघ्या काही मिनिटांत होणार आहे.