भीषण अपघातात दुचाकीस्वार दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

डोंगरगाव मार्गावरील घटना

    दिनांक :15-Nov-2026
Total Views |

अर्जुनी मोरगाव,
bhandara-two-youths-road-accidentअर्जुनी मोरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत सानगडी ते दिघोरी मार्गावरील डोंगरगाव रोडवर भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.
 

accident 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भावेश जयकिशन फुंडे (२६) रा. सालेबर्डी, ता. साकोली, जि. भंडारा आणि देवेंद्र माधवराव कठाणे (२०) रा. विहीरगाव/कण्हाळ्या, ता. लाखांदूर, जि. भंडारा हे दोघे दुचाकीने लाखांदूर येथून काम आटोपून आपल्या गावी परत जात होते. दरम्यान, सानगडी ते दिघोरी मार्गावरील डोंगरगाव परिसरात सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास मागून येणार्‍या अज्ञात वाहनाच्या चालकाने आपले वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
 
या भीषण धडकेत दुचाकीवरील दोन्ही युवक गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून तरुण वयात दोघांचा झालेला मृत्यू हळहळ व्यक्त करणारा आहे. या प्रकरणी मृत भावेश फुंडे यांचे वडील जयकिशन अंतराम फुंडे (५९) रा. सालेबर्डी यांनी अर्जुनी मोरगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीच्या आधारे अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक मंगेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक ताटस्कर करीत आहेत.
...